Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं टक्कल, पतीच्या आठवणीत त्याचं ब्लेझर घालून फोटोशूट; ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:17 IST

1 / 8
१९९१ साली आलेल्या 'सौगंध' सिनेमात दिसलेली शांति प्रिया(Shanthi Priya) आठवतेय? सिनेमात अक्षय कुमारसोबत ती झळकली होती. शांति प्रियाने हिंदी आणि साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे केले.
2 / 8
शांति प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. यात तिने पूर्ण टक्कल केलं आहे. ब्लेझर घालून तिने हे फोटोशूट केलंय.
3 / 8
चॉकलेटी रंगाचं ब्लेझर आणि बाल्ड लूकमुळे ती चर्चेत आली आहे. पण तिने टक्कल का केलं? असा प्रश्न पडतो.
4 / 8
शांतिप्रियाने घातलेला हा कोट तिच्या दिवंगत पतीचा आहे. तिने लिहिले, 'नुकतंच मी टक्कल केलं आणि मला बराच अनुभव मिळाला. स्त्री म्हणून आपण नेहमीच आयुष्यात मर्यादा आखत असतो, नियमांचं पालन करतो आणि इतकंच नाही तर स्वत:ला पिंजऱ्यात बंद करतो.'
5 / 8
पण मी या लूकसोबत स्वत:ला स्वतंत्र केलं आहे. जगाने लावलेल्या ब्युटी स्टँडर्ड्सला तोडण्याची प्रयत्न केला आहे. अतिशय धैर्य आणि विश्वासाने मी हे पाऊल उचललं आहे.'
6 / 8
पतीच्या आठवणीत ती म्हणाली, 'आज मी माझे दिवंगत पती यांच्या आठवणीत त्यांची एक गोष्ट माझ्यासोबत ठेवली आहे. हा त्यांचा ब्लेझर आहे ज्यात आजही मला त्यांची ऊब जाणवते. जगातील प्रत्येक स्त्रीला शक्ती आणि प्रेम लाभो.'
7 / 8
१९९९ साली शांतीप्रिया सिद्धार्थ रे सोबत लग्नबंधनात अडकली होती.लग्नानंतर तिने बॉलिवूडला राम राम ठोकला. मात्र 2004 साली तिच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांतीप्रियावर आली.
8 / 8
१९९९ साली शांतीप्रिया सिद्धार्थ रे सोबत लग्नबंधनात अडकली होती.लग्नानंतर तिने बॉलिवूडला राम राम ठोकला. मात्र 2004 साली तिच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांतीप्रियावर आली.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडअक्षय कुमारव्हायरल फोटोज्सोशल मीडिया