Join us

'गदर 2' मध्ये तारा सिंगची सून होणार 'ही' अभिनेत्री, इंटिमेट सीन्समुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:56 AM

1 / 8
2001 मध्ये आलेल्या 'गदर' सिनेमानंतर तब्बल २२ वर्षांनी 'गदर 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकीनाची आयकॉनिक लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'गदर'मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासोबत त्यांच्या मुलाची भूमिका करणाऱ्या चिमुकल्यानेही लक्ष वेधलं होतं.
2 / 8
'गदर २' मध्ये आता त्यांचा मुलगा मोठा झाला असून तारा सिंग आणि सकीनाची सूनही दाखवण्यात आली आहे. ही सूनेची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सिमरत कौर हिने. यावेळी सिनेमात सनी देओल सिमरतची सुटका करायला पाकिस्तानला जाणार असं बोललं जातंय. सिमरत कौर (Simrat kaur) नक्की कोण आहे आणि तिला ही भूमिका कशी मिळाली जाणून घेऊया.
3 / 8
सिमरत कौरने 2017 मध्ये तेलुगू सिनेमा 'प्रेमाथो मी कार्तिक' मधून डेब्यू केले. यानंतर ती 'परिचयम','सोनी' आणि 'डर्टी हॅरी' सारख्या सिनेमातही दिसली.
4 / 8
सिमरत कौरने खरं लक्ष वेधलं ते इरॉटिक थ्रिलर फिल्म 'डर्टी हॅरी' सिनेमातून. यामध्ये तिने बरेट बोल्ड सीन्स दिले होते. तिच्या लिपलॉक आणि स्टीमी सीन्समुळे ती चर्चेत आली होती.
5 / 8
सिमरत असे सीन्स करताना आधी खूप अनकंफर्टेबल होती. या फिल्ममध्ये काम करण्यापूर्वी तिने आईशी चर्चा केली. आईने हो म्हटल्यावरच तिने सिनेमा साईन केला.
6 / 8
सिमरत २५ वर्षांची असून पंजाबी कुटुंबात जन्माला आली आहे. तिने सिनेमांव्यतिरिक्त पंजाबी म्युझिक व्हिडिओही केले आहेत. गायक मिका सिंहसोबतही तिने काम केलं आहे.
7 / 8
सिमरत आता 'गदर 2' मुळे चर्चेत आली आहे. तिला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळालाय. यामध्ये तिने सनी देओलच्या सुनेची भूमिका साकारली आहे.
8 / 8
'गदर 2' आधीच सिमरतला आणखी एक साऊथ सिनेमा मिळालाय. माध्यम रिपोर्ट्सनुसार 'किच्चा 46' मध्ये तिची वर्णी लागली आहे. कन्नड स्टार किच्चा सुदीप पोलिसाच्या भूमिकेत आहे. ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर फिल्म असणार आहे.
टॅग्स :सनी देओलअमिषा पटेलसिनेमा