३९ वर्षांची अभिनेत्री, एका मुलाची आई; तरी 'स्कूल गर्ल' च्या भूमिकांची मिळतेय ऑफर By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:13 PM1 / 7अभिनेत्रींना कायमच त्यांच्या वजन आणि सौंदर्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. नाहीतर त्यांना सिनेमा मिळणं कमी होतं. म्हणून अभिनेत्री त्यांच्या लूक्सकडे विशेष लक्ष देतात. बॉलिवूडमध्ये अशाही अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाजच लागत नाही.2 / 7सध्या अशीच एक अभिनेत्री चर्चेत आहे. बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून ती लोकप्रिय झाली होती. अभिनेत्रीचं वय आता 39 असून तिला २ वर्षांचा एक मुलगाही आहे. तरी अभिनेत्रीला 18-19 वयाच्या मुलींच्या भूमिका ऑफर होत आहेत.3 / 7ही अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor). सोनमकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लागणार नाही. नुकतंच सोनमने एका मुलाखतीत तिला सध्या ऑफर होणाऱ्या भूमिकांविषयी सांगितले. 4 / 7सोनम म्हणाली, '१८-१९ वर्षांच्या वयाच्या भूमिका मिळणं मला चांगलंही वाटतं पण विचित्रही वाटतं. नुकतंच मला अशी भूमिला ऑफर झाली जिच्या आईबाबांना तिचं लग्न लावून द्यायचं आहे. मी विचार केला की खरंच या भूमिकेसाठी मी योग्य आहे?'5 / 7'ती भूमिका एका शाळेतल्या मुलीची होती जी नंतर खेळाडू बनते. पण याला काही अर्थ नाही. ऑफर आली तेव्हा मला वाटलं की या भूमिकेत मोठ्या वयासाठी मला घेण्यात येईल आणि तरुण अभिनेत्रीला लहान वयासाठी घेण्यात येईल. पण त्यांना पूर्ण सिनेमात मीच हवी होते.'6 / 7'मी त्यांना नाही सांगितलं. मला आता कमी वयाच्या मुलीच्या भूमिका करायच्या नाहीत. आता मी काही जान्हवी किंवा खुशी सारखी लहान दिसत नाही. मला एक मुलगा आहे आणि माझं वय ३९ आहे तरी लोक मला आजही तरुण समजत आहेत त्यासाठी मी खरंच आभारी आहे.'7 / 7सोनम कपूर शेवटची 'ब्लाइंड' या सिनेमात दिसली होती. तिने दोन वर्षांपूर्वी वायूला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर तिला पूर्ण लक्ष त्याच्याकडे द्यायचं आहे. म्हणूनच ती आता अभिनयापासून दूर असल्याचं सांगते. आणखी वाचा Subscribe to Notifications