Join us

पती प्लेन क्रॅशमध्ये गेल्यावर अभिनेत्रीचा होता आत्महत्येचा विचार, पण 'तो' प्रसंग ठरला 'टर्निंग पॉइंट'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:06 PM

1 / 9
शाहरुख खानचा 2007 साली आलेला 'चक दे इंडिया' सिनेमा चांगलाच गाजला होता. सिनेमात दाखवलेल्या हॉकी टीममधील सर्व मुली लोकप्रिय झाल्या. त्यापैकीच एक मराठमोळी विद्या माळवदे (Vidya Malvade).
2 / 9
सिनेमात विद्या हॉकी टीममध्ये गोलकीपर होती. पेनल्टी शूटआऊटवेळी विद्या आणि शाहरुखचा एक सीन कायम लक्षात राहणाराच आहे. या सिनेमातून विद्याही चांगलीच चमकली.
3 / 9
विद्या मराठी कुटुंबात जन्माला आली. तिचे वडील वकील होते त्यामुळे तिनेही आधी वकिलीचे शिक्षण घेतले. पण शिक्षणानंतर तिने प्रॅक्टिस केली नाही. ते सोडून तिने एअर लाईनमध्ये काम करायला सुरुवात केली.
4 / 9
एक दिवस विद्याला एक जाहिरात मिळाली आणि त्यातून तिला पहिल्यांदाच खूप मानधन मिळालं. एका जाहिरातीतून एवढे पैसे मिळतात पाहून ती या क्षेत्रात आली. मात्र तिने एअर हॉस्टेसचं काम करत करतच जाहिरातीत काम केले.
5 / 9
जाहिरातीनंतर 'इंतेहान' हा तिचा पहिला सिनेमा ठरला. पण याचदरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं. वयाच्या केवळ २३ व्या वर्षी तिने पतीला गमावलं.
6 / 9
1997 सालीच तिने अरविंद सिंह बग्गासोबत लग्न केलं होतं. अरविंद बग्गा पायलट होते. लग्नानंतर केवळ 3 वर्षातच अरविंद बग्गा यांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला. त्यावेळी विद्या एअर हॉस्टेस होती आणि ती जर्मनीत होती. प्लेन क्रॅशनंतर तिच्या क्रूने विद्याला भारतात परत पाठवलं.
7 / 9
एवढ्या कमी वयात पतीला गमावल्याचा तिच्यावर आघात झाला होता. ती पूर्णपणे कोसळली होती. तिलाही आत्महत्या करण्याची इच्छा झाली. तिने आजूबाजूच्या केमिस्टमधून झोपेच्या गोळ्या घेतल्या. ती गोळ्या खाणारच होती तेवढ्यात तिचे वडील खोलीत आले. त्यांच्याकडे बघून तिला जाणवलं जे आपण करत आहोत ते खूप स्वार्थी आहे. अशा प्रकारे तिने आत्महत्येचा विचार सोडला.
8 / 9
विद्याने 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा','किडनॅप','बेनाम','नो प्रॉब्लेम' या सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय ती 'मिसमॅच्ड' या वेबसीरिजमध्येही दिसली. काही रिअॅलिटी शोजमध्येही तिने भाग घेतला.
9 / 9
2009 साली विद्याने दुसरं लग्न केलं. संजय दामा असं तिच्या पतीचं नाव आहे. ती 51 वर्षांची असून कमालीची फिट आहे. अनेकदा तिने बिकीनीतही फोटो पोस्ट केले आहेत. तिचा सोशल मीडियावर वेगळा चाहतावर्ग आहे.
टॅग्स :विद्या माळवदेसेलिब्रिटीपरिवारबॉलिवूड