Join us

Adah Sharma : "हे माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं..."; अभिनेत्री अदा शर्मा कधीच करणार नाही लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:43 IST

1 / 9
अभिनेत्री अदा शर्माचा 'केरळ स्टोरी' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती.
2 / 9
सुशांत सिंह राजपूतचं घर खरेदी केल्यामुळे अदा काही महिन्यांपूर्वी जोरदार चर्चेत आली होती.
3 / 9
आता ती तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. अदाला लग्न करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने सांगितलं की, तिला लग्न करायचं नाही.
4 / 9
'माझं स्वप्न आहे की, मी लग्न करू नये. लग्नाचं स्वप्न पाहणं हे माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं असेल.'
5 / 9
'मला कोणत्याही नात्याची किंवा नात्यात अडकायची भीती वाटत नाही.'
6 / 9
'मी पडद्यावर नवरीची भूमिका अनेक वेळा साकारली आहे. खऱ्या आयुष्यात लग्न करण्याची इच्छाच आता नाहीशी झाली आहे.'
7 / 9
'भविष्यात जर मला लग्न करायचं असेल तर मी आरामदायी कपड्यांमध्ये लग्न करेन. त्या जड लेहेंग्यात नाही' असं अदाने म्हटलं आहे.
8 / 9
अदा शर्माने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिचे असंख्य चाहते आहेत.
9 / 9
टॅग्स :अदा शर्माबॉलिवूडलग्न