एकनाथ शिंदे ते अजित पवार गट! कोणत्या पक्षाला कुणाचा सपोर्ट? मराठी कलाकारही राजकीय रिंगणात By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 12:49 PM1 / 10सध्या सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय गटांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक जण आगामी निवडणुकांविषयीच भाष्य करत आहे. यामध्येच काही असेही मराठी कलाकार आहेत ज्यांनी राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. तर, काही जण कित्येक वर्षांपासून राजकीय पक्षांसाठी काम करत आहेत.2 / 10मराठीसह बॉलिवूडपर्यंत कोणते कलाकार कोणत्या राजकीय पक्षात आहेत ते जाणून घेऊयात.3 / 10हार्दिक जोशी - तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या हार्दिक जोशीने अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिव चित्रपट सेनामध्ये प्रवेश घेतला आहे. त्याच्यासोबत सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, आदिती सारंगधर, माधव देवचके, अमोल नाईक, प्रतीक पाटील हे कलाकार एकनाथ शिंदे यांच्या शिव चित्रपट सेनेसाठी काम करतात.4 / 10गोविंदा आहुजा - बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. 5 / 10प्रिया बेर्डे- अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि मेघा धाडे यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला आहे. भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठसाठी काम करतात. यापूर्वी प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या.6 / 10अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि मेघा धाडे या भाजप पक्षात आहेत. त्या भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ साठी काम करतात. प्रिया बेर्डे याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या.7 / 10किशोरी शहाणे- लोकप्रिय मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे या भाजप चित्रपट कामगार आघाडी वितरक म्हणून काम करतात. त्यांच्यासोबतच समीर दीक्षित,आनंद काळे हेदेखील वितरक म्हणून काम करतात. तर, किशोर कदम, प्रथमेश परब आणि एन. चंदा हे सल्लागार म्हणून काम पाहतात.8 / 10महेश मांजरेकर- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे. तसंच संजय नार्वेकर, सायली संजीव, स्मिता तांबे, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदारदेखील कित्येक वर्षांपासून या पक्षासाठी काम करतायेत.9 / 10मराठी अभिनेता आणि उत्तम सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांची साथ देत आहेत. यामध्येच आता अभिनेता किरण माने हेदेखील उद्धव ठाकरेंसोबत काम करु लागले आहेत.10 / 10विजय पाटकर- गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी कलाविश्वात सक्रीय असलेले विजय पाटकर आणि असित रेडीज हे अजित पवार गट सांस्कृतिक विभागासाठी काम करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications