"राखी सावंतने माझी सुपारी दिली, ती मला मारून टाकेल"; आदिलचा धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 4:23 PM1 / 10ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. राखी आणि आदिल दुर्रानी दररोज एकमेकांबद्दल धक्कादायक खुलासे करत आहेत. सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे.2 / 10अलीकडेच एका पत्रकार परिषदेत आदिल दुर्रानीने आपल्याला वाटत असलेल्या एका भीतीबद्दल सांगितलं. ETimes च्या रिपोर्टनुसार, आदिलने सांगितले की, राखीपासून त्याच्या जीवाला मोठा धोका आहे.3 / 10आदिलने दिलेल्या माहितीनुसार, 'राखीकडे जे काही पुरावे आहेत ते कोर्टाकडे सोपवा. ती असंच काहीतरी बोलून मला दोष देऊ शकत नाही.'4 / 10'राखीने मला मारण्यासाठी सुपारी दिली होती. मी म्हैसूरमधील सुपारी किलरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. माझा जीव धोक्यात आहे.'5 / 10'मला काही झालं आणि माझा मृत्यू झाला तर त्याला राखी आणि शैली लाठर जबाबदार असतील. शैली सुपारी किलर आहे.'6 / 10राखीने सांगितलं की, आदिल तिच्याशी प्रत्येक गोष्टीत खोटं बोलत आहे. ड्रामा क्वीनने असंही सांगितलं की, आदिलने तिच्या आधी दोन तीन वेळा लग्न केलं होतं.7 / 10आदिल दुर्रानीने तिला मारण्याचा कट रचला होता, जे शर्लिन चोप्राने मान्य केल्याचेही राखीने सांगितले. राखी आणि आदिलची नेहमीच चर्चा होत असते. 8 / 10राखीने आता केस कापले आहेत. राखी म्हणते की, ती गरीब झाली आहे. आदिलने तिची अशी वाईट अवस्था केली, आदिलमुळे केस गळाले. आदिलने माझे पैसेही लुटले. आता माझी काय अवस्था झाली आहे. 9 / 10राखी सावंत भावूक झाली. राखीने तिचे लांब केस कापले आहेत. राखी सावंतच्या म्हणण्यानुसार, ती सध्या खूप तणावातून जात आहे आणि त्यामुळे तिचे केस गळायला लागले आहेत. 10 / 10राखी सावंत तिचा पती आदिल खानच्या फसवणुकीबद्दल सर्वत्र चर्चा करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी उमराह करून मुंबईत परतली होती. विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. तिने पापाराझींना राखीऐवजी फातिमा म्हणण्यास सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications