aditi rao hydari actress comes from royal family had been married at the age of 21 then had divorce
राजघराण्यातून आली 'ही' अभिनेत्री, २१ व्या वर्षीच केलं लग्न; घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 1:50 PM1 / 7फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचं प्रत्येकाचं बॅकग्राऊंड आपल्याला माहित नसतं. अशीच एक अभिनेत्री आहे जिने गाजलेल्या हिंदी, साऊथ सिनेमा, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. 2 / 7आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयाचा जलवा दाखवणारी ही अभिनेत्री राजघराण्यातून आली आहे. नुकतंच तिचं दुसरं लग्नही झालं. या अभिनेत्रीला ओळखलंत का?3 / 7हिंदी ते साऊथ सिनेमा, तसंच ओटीटी गाजवणारी ही अभिनेत्री आहे अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari). आज अदिती ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. काही दिवसांपूर्वी ती दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. 4 / 7अदितीचा जन्म २८ ऑक्टोबर १९८६ रोजी हैदराबादमध्ये झाला. तिचे पणजोबा अकबर हैदरी १८६९ ते १९४१ पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते. तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी आसामचे माजी राज्यपाल होते. तिची आई विद्या राव या प्रसिद्ध गायिका आहेत.5 / 7अदितीने २००६ सालीच साऊथ इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. यानंतर तिने काही साऊथ सिनेमे केले आणि मग ती बॉलिवूडमध्ये आली. 6 / 7अदिती बॉलिवूडमध्ये पदार्पणाआधीच लग्नबंधनात अडकली होती. २००९ साली वयाच्या केवळ २१ व्या वर्षी तिने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं. मात्र २०१३ साली त्यांचा घटस्फोट झाला.7 / 7आता २०२४ मध्ये तिने सिद्धार्थसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. सिद्धार्थचंही हे दुसरं लग्न आहे. 'महा समुद्रम' च्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणखी वाचा Subscribe to Notifications