Aditya Thackeray, Bollywood Actress: आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्रीनी केली १-२ नव्हे तब्बल 5 Hearts वाली कमेंट By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 5:07 PM1 / 9Aditya Thackeray, Bollywood Actress: आदित्य ठाकरे यांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील ठाकरे सरकार नुकतेच कोसळले. महाविकास आघाडी अल्पमतात असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.2 / 9२०१९ मध्ये अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांना पर्यटन व पर्यावरण खात्याचे मंत्रीपद मिळाले होते. या काळात त्यांनी आपला कार्यभार उत्तम रितीने सांभाळला.3 / 9आदित्य यांच्या क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींशी ओळखी आण मैत्री आहे हे सर्वश्रुत आहे. याच दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरताना दिसतेय.4 / 9उद्धव ठाकरे यांच्या जिद्दीला सलाम करणारा एक भावनिक मेसेज आदित्य यांनी इन्स्टाग्राम पोस्टमार्फत लिहिला. 'नेहमी योग्य माणसांचा आदर्श घेणं महत्त्वाचे असते. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचा ऋणी आहे. तुमचे प्रेम हीच आमची खरी ताकद आहे', अशा कॅप्शनसह इन्स्टाग्राम पोस्ट आदित्य यांनी केली.5 / 9उद्धव ठाकरे यांच्या जिद्दीला सलाम करणारा एक भावनिक मेसेज आदित्य यांनी इन्स्टाग्राम पोस्टमार्फत लिहिला. 'नेहमी योग्य माणसांचा आदर्श घेणं महत्त्वाचे असते. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचा ऋणी आहे. तुमचे प्रेम हीच आमची खरी ताकद आहे', अशा कॅप्शनसह इन्स्टाग्राम पोस्ट आदित्य यांनी केली.6 / 9आदित्य यांच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहना कुमरा (Aahana Kumra) हिने कमेंट केली. तसे पाहता या पोस्टवर अनेकांनी विविध कमेंट्स केल्या. पण आहना हिने पोस्टमध्ये काही न लिहिता, केवळ बदामाचे चिन्ह काढले. तिने एक-दोन नव्हे तर तब्बल ५ Hearts कमेंट्समध्ये लिहिल्याने या कमेंटची काही अंशी चर्चा रंगल्याचे दिसून आले.7 / 9आहना कुमरा ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'युद्ध' आणि अभिनेता शरद केळकर याच्याबरोबर 'एजंट राघव-क्राईम ब्रँच' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.8 / 9बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीचा विचार मांडणारा 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच, 'द अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटांमध्ये तिने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भूमिका केली आहे.9 / 9अनेक वेब सिरीजच्या माध्यमातूनही ती चाहत्यांच्या भेटीस आली आहे. सध्या चर्चा असलेल्या सोनी लिवच्या अवरोध-२ मध्ये तिने खलनायिकेची भूमिका उत्तम वठवली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications