अनुष्का करिनानंतर आता 'ही' अभिनेत्री देणार तिस-यांदा बाळाला जन्म, जूनमध्ये होणार बाळाचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 11:25 IST
1 / 10अलीकडेच लिसाने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटो शेअर करत तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. लिसाचे हे बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.2 / 10लिसाची डिलेव्हरी 3 जूनला होणार आहे. सध्या बाळाच्या आगमनाची ती आतुरतेने वाट पाहात आहे. लीसा 2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती.3 / 10लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे 17 मे 2017 रोजी लीसा ने मुलाला जन्म दिला होता. यानंतर 2020 मध्ये तिच्या दुस-या मुलाचा जन्म झाला होता.4 / 10लिसा आणि दिनोचे थायलंडच्या फुकेत येथील अमनपुरी बीच रिसॉर्टमध्ये लग्न झाले होते. लिसाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचेही फोटो शेअर करत असते.5 / 10लिसाचा पती दिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश उद्योजक गुल्लू लालवाणीचा मुलगा आहे.6 / 10लीसा अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल; या चित्रपटात बघावयास मिळाली होती. लीसा ने आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.7 / 10 नुकतेच लीजाने कुटुंबासह बेबी शॉवर केले. त्याचा व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत लीजा बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना दिसते. कुटुंब आणि मित्रांसह ती मस्त एन्जॉय करताना दिसतेय. 8 / 10इतकेच काय तर लीजा डान्स करतानाही दिसते. सध्या तिचा हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी व्हिडीओला पसंती देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.9 / 10लीसाच्या पहिल्या प्रेग्नंसीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. प्रेग्नंसीकाळात तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटचीही प्रचंड चर्चा झाली होती. तिस-यांदा प्रेग्नंट असलेली लीजा पुन्हा एकदा त्याच कारणामुळे सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.10 / 10लिसा सध्या तिची तीसरी प्रेग्नंसी फुल ऑन एन्जॉय करताना दिसतेय.