Join us

Uorfi Javed: -म्हणून मी माझे कपडे स्वत:च डिझाईन करायला लागले, उर्फी जावेदने सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 1:48 PM

1 / 11
मेरी जावेद आणि बेपनाह अशा मालिकेत काम करणारी, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत असते ती तिच्या तोकड्या, अतरंगी कपड्यांमुळे.
2 / 11
होय, उर्फी तोकडे कपडे घालून मिरवते आणि तिच्या कामापेक्षा तिच्या या बोल्ड, अतरंगी कपड्यांचीच चर्चा होते. यावरून ती सतत ट्रोल होते. पण ट्रोलर्स पर्वा करेल ती उर्फी कुठली? कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना उर्फी सणसणीत उत्तर देते.
3 / 11
एकेकाळी उर्फीसोबत कोणताही डिझाईनर काम करायला तयार नव्हता. कुणीही तिला आपली मॉडेल बनवायला तयार होईना. पण आता हीच उर्फी माेठ मोठ्या डिझायनर्ससोबत काम करतेय.
4 / 11
डर्टी मॅगझिनसाठी फोटोशूट करण्यापासून टॉप स्टायलिस्ट अनीता श्रॉफ, अबू जानी, संदीप खोसला, गौरव गुप्ता अशा दिग्गज डिझायनर्ससोबत तिने काम केलंय.
5 / 11
अलीकडे हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्फी यावर बोलली. ट्रोलिंग, अंतरंगी बोल्ड कपडे अशा सगळ्यांबाबत ती बोलली.
6 / 11
मी दिग्गजांसोबत काम केलं, करतेय. ही एक चांगली फिलिंग आहे, पण मला कुणाच्याही मान्यतेची गरज नाही. मी जे काही केलं, त्यामुळे आज मी पॉप्युलर आहे. यामुळेच काही मोठे डिझायनर्स मला ड्रेस अप करत आहेत, असं ती म्हणाली.
7 / 11
सुरूवातीला कोणताही डिझायनर मला आपला ड्रेस द्यायला तयार नव्हता. त्यामुळे मी स्वत:च स्वत:चे कपडे डिझाईन करायला सुरूवात केली. मी काय करतेय, हे माझं मलाच कळेना, मग लोक माझ्यावर विश्वास कसे ठेवणार होते. आज त्यांना माझं व्हिजन दिसतंय, असं ती म्हणाली.
8 / 11
डिझायनर्स मला आपले कपडे द्यायला तयार नव्हते. पण मला कधीच याचं वाईट वाटलं नाही. मी स्वत:ला सिद्ध केलं. अर्थात मी सक्सेस झालं असं नाहीये, असंही ती म्हणाली.
9 / 11
पुढे ती म्हणाली, यावेळी माझ्याजवळ काम नाहीये. मी फॅशनेबल आहे, पण यामुळे काम मिळतंच असं नाही. फक्त तुमची मेहनत तुम्हाला काम मिळवून देऊ शकते. मी आशावादी आहे, इतकंच.
10 / 11
‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
11 / 11
गतवर्षी उर्फी Most Searched Asian 2022 यादीत आली. ना मालिका, ना मोठे शो, ना चित्रपट... काहीही नसताना उर्फीने केवळ अतरंगी फॅशनच्या जोरावर जगभरातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवलं.
टॅग्स :उर्फी जावेद