Join us

‘आरआरआर’ तो बस ट्रेलर है... ! लवकरच मोठा धमाका करणार आहेत साऊथचे हे मोठे सिनेमे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 5:16 PM

1 / 8
देशभरातील प्रेक्षकांना साऊथचे सिनेमे अधिक आवडायला लागले आहेत. जयभीम, केजीएफ 1,पुष्पा आणि आता आरआरआरची त्सुनामी आली आहे. पण ये तो बस ट्रेलर है दोस्तो... पूरी पिक्चर अभी बाकी है. होय, RRRनंतर साऊथचे अनेक मोठे सिनेमे चित्रपटगृहांत धडकणार आहेत.
2 / 8
केजीएफ - चॅप्टर 2: आरआरआरनंतर रॉकी पुन्हा परततोय. होय, कन्नड स्टार यशचा केजीएफ 2 हा सिनेमा येत्या 14 तारखेला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. 100 कोटी बजेट असलेल्या या सिनेमात संजय दत्तने व्हिलनची भूमिका केली आहे. रवीना टंडनही या चित्रपटात एका खास भूमिकेत आहे. केजीएफ1 ने बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घातला होता. केजीएफ 2 कडूनही तशाच अपेक्षा आहेत.
3 / 8
लाइगर : लायगर हिंदी आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये शूट करण्यात आला आहे. साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा यात बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. यात विजय देवरकोंडाचा अँग्रीमॅन अवतार पाहायला मिळणार आहे. शिवाय अनन्या पांडे, रोनि रॉय आणि राम्या कृष्णनच्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिक भूमिका आहेत. हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
4 / 8
आदिपुरुष : साऊथचा सुपरस्टार प्रभासचा ‘राधेश्याम’ बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण प्रभास पुन्हा धमाकेदार वापसी करणार आहे. दिग्दर्शक ओम राऊतच्या आगामी ‘आदिपुरूष’ सिनेमात प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. कृति सेनन सीतेच्या तर सैफ अली खान लंकेश रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा जानेवारी 2023 मध्ये रिलीज होऊ शकतो.
5 / 8
सालार : प्रभासची मुख्य भूमिका असलेला साऊथ इंडियन अ‍ॅक्शन थ्रीलर ‘सालार’ हा सिनेमा कन्नड आणि तेलुगू भाषेत शूट केला आहे. प्रशांत नील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. त्यांनी केजीएफ चॅप्टर 1 चं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा हिंदी, मल्याळम आणि तमिळमध्येही रिलीज होणार आहे. मे 2022 मध्ये हा सिनेमा रिलीज होऊ शकतो.
6 / 8
घनी : घनी हा एक पिरियड स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा आहे. यात वरूण तेज आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा डिसेंबर 2022 मध्ये रिलीज होईल.
7 / 8
आचार्य : या सिनेमात चिरंजीवी, राम चरण, काजल अग्रवाल, सोनू सूद आणि पूजा हेगडे दिसणार आहेत. हा एक अ‍ॅक्शन-ड्रामा सिनेमा आहे. या सिनेमाचं बजेट 140 कोटी रुपये आहे. 29 एप्रिल 2022 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये धडकणार आहे.
8 / 8
बीस्ट : सुपरस्टार विजय या सिनेमात दिसणार आहे. तसेच त्याच्यासोबत पूजा हेगडेही दिसणार आहे. हा सिनेमा एप्रिल महिन्यात रिलीज होणार अशी चर्चा आहे. अ‍ॅक्शन व एंटरटेनमेंटचा डोस असलेल्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
टॅग्स :आरआरआर सिनेमाTollywoodकेजीएफप्रभास