Join us

Aishwarya Narkar: शॉर्ट्स घालण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी दिलं चोख उत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 11:37 AM

1 / 11
ऐश्वर्या नारकर यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
2 / 11
वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुणींनाही लाजवेल असे ऐश्वर्या नारकर यांचे मनमोहक रुप आहे. त्यांच्याकडे बघून अनेकांना वयाचा अंदाजही येणार नाही.
3 / 11
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या बऱ्याचदा फोटो शेअर करत असतात.
4 / 11
ऐश्वर्या नारकर सतत आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असतात.
5 / 11
पन्नाशी जवळ आलेल्या ऐश्वर्या नारकर दिवसेंदिवस अधिकच सुंदर होत आहेत.
6 / 11
नुकतेच ऐश्वर्या नारकर यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, शॉर्ट्स घालण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
7 / 11
यावेळी ऐश्वर्या म्हणाल्या की, 'एकतर मी कधी शॉर्ट्स घातले नव्हते. पण आता घालतेय तर अनेकजण ट्रोल करत आहेत.
8 / 11
ज्यांना जे कम्फर्टेबल वाटते त्यांनी ते करावे. कोणाचंही कोणाशी काहीच घेणं-देणं नाही, असे त्या म्हणाल्या.
9 / 11
तुम्हाला जर एखादी व्यक्ती किंवा कपडे आवडत नसतील तर त्यांना अनफॉलो करण्याचे आपल्याकडे छान ऑप्शन आहेत, असेही त्या म्हणाल्या.
10 / 11
त्या पुढे म्हणाल्या की, इतकंच नाही आवडलं तर तुम्ही ते चांगल्या भाषेमध्ये सुद्धा सांगू शकता. आणि जे मला चांगलं वाटतं ते मी करणारच, मग ते कोणाला नाही आवडलं तरी हरकत नाही.
11 / 11
त्यांनी पुढे असंही म्हटले की, 'ट्रोल करण्यामध्ये एनर्जी घालवण्यापेक्षा आपण आपला फिटनेस राखण्यासाठी काय करतो यावर लक्ष द्यावे. मला मी आता फिट वाटतेय, आणि त्या कपड्यांमध्ये मी फिट बसतेय तर मी ते घालणार'.
टॅग्स :ऐश्वर्या नारकर