IN PICS : लाखो लोक ऐश्वर्याला फॉलो करतात ती केवळ ‘या’ एकालाच फॉलो करते...!! By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 3:55 PM1 / 10सौंदर्याची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. 2 / 10ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वयाचं अख्खं बालपण मुंबईत गेलं आणि याच मुंबईत राहून तिनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.3 / 10 अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.4 / 10दीर्घकाळापासून ऐश्वर्याचा एकही नवा सिनेमा रिलीज झालेला नाही. पण तिच्या फॉलोअर्सची संख्या मात्र वाढतेय.5 / 10इन्स्टाग्रामवर तिचे 95 लाख फॉलोअर्स आहे. पण ऐश्वर्या स्वत: कोणाला फॉलो करते माहितीये? तर फक्त एका व्यक्तिला.6 / 10होय, इन्स्टावर लाखो जण ऐश्वर्याला फॉलो करतात ती मात्र केवळ एकाच अभिनेत्याला फॉलो करते. तो कोण तर तिचा नवरा अभिषेक बच्चन.7 / 10अगदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेले महानायक व तिचे सासरे अमिताभ बच्चन यांनाही ती फॉलो करत नाही. मग जया बच्चन आणि नणंद श्वेता तर दुरची बात.8 / 10तू फक्त अभिषेक बच्चन यालाच का फॉलो करते? असा प्रश्न तिला अनेकदा विचारला गेला. पण प्रत्येकवेळी अगदी चतुराईनं तिनं या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. 9 / 10ऐश्वर्याचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहाल तर त्यामध्ये केवळ कुटुंबीयांसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ दिसतील. पती अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या, सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे फोटो ती शेअर करते.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications