Join us

दुबईत घरं, लक्झरी गाड्या! Panama Papers Leak प्रकरणात अडकलेल्या ऐश्वर्या रायची संपत्ती किती माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 5:44 PM

1 / 9
बॉलिवूडचं सौंदर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. Panama Papers Leak प्रकरणात ऐश्वर्याचं नाव आलं असून नुकतीच तिचे ED ने तब्बल सहा तास चौकशी केली आहे.
2 / 9
ED ने केलेल्या चौकशीमध्ये ऐश्वर्याला तिच्या मालमत्तेविषयी आणि विदेशात गुंतवणूक केलेल्या प्रॉपर्टी, कंपन्यांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले.
3 / 9
ऐश्वर्या ED च्या रडारवर आल्यानंतर अनेक जण तिची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
4 / 9
caknowledge नुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती ३१ मिलिअन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार २२७ कोटी रुपये.
5 / 9
ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून ऐश्वर्याची सर्वाधिक कमाई होत असल्याचं सांगण्यात येतं. २००४ मध्ये ऐश्वर्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मदत म्हणून ऐश्वर्या राय फाऊंडेशनची स्थापना केली.
6 / 9
ऐश्वर्याला गाड्यांची विशेष आवड असून तिच्याकडे मर्सिडीज बेंझ, ऑडी यांसारख्या कार आहेत.
7 / 9
ऐश्वर्याचं तिच्या लेकीवर आराध्यावर किती प्रेम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. ऐश्वर्या, आराध्याच्या बाबतीत प्रचंड प्रोटेक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच तिने लेकीसाठी एक मिनी कूपरदेखील खरेदी केली आहे.
8 / 9
ऐश्वर्याची स्वत:ची दोन घरं आहेत. यातील एक घर मुंबईत आहे. तर, दुसरं घर दुबईमध्ये आहे.
9 / 9
ऐश्वर्याचं दुबईतील घर जुमेराह गोल्फ इस्टेट येथे आहे. विशेष म्हणजे जागातील सर्वात आलिशान घरांमध्ये या घराचा समावेश केला जातो.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा