Happy Birthday Aishwarya : तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील ऐश्वर्या रायचे ‘हे’ फोटो...!! By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 11:27 AM1 / 13सौंदर्याची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.2 / 13ऐश्वयाचं अख्खं बालपण मुंबईत गेलं आणि याच मुंबईत राहून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.3 / 13ऐश्वर्याने आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात तिचं शिक्षण झालं. सौंदर्याची देण होतीच. यामुळेच ऐश्वर्या आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात ओढली गेली.4 / 13या मॉडेलिंगच्या दुनियेत वावरत असताना मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण या स्पर्धेत सुश्मिता सेन अव्वल ठरली आणि ऐश्वर्याला दुसरा क्रमांक मिळाला.5 / 13अर्थात पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूट तिच्या डोक्यावर सजला. मिस इंडिया, मिस वर्ल्ड स्पर्धेनंतर बॉलिवूडमध्ये ती आली.6 / 13मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीची सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट.7 / 13दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषिक चित्रपटात काम केलं. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला.8 / 13यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली.9 / 13कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. जेव्हा ती पहिल्यांदा पिवळी साडी नेसून कान्स सोहळ्यात गेली होती, तेव्हा तिला पाहून 10 मिनिटं सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता.10 / 13ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका आहे. वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ होते. तिचा धाकटा भाऊ मर्चंत नेव्हीत आहे.11 / 13जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे.12 / 13सुरुवातीला ऐश्वर्या ऐश्वर्याला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे होते. नंतर, तिने ही कल्पना सोडली आणि आर्किटेक्चरचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मात्र मॉडेलिंगमध्ये जाण्यासाठी तिने अभ्यास सोडला.13 / 13ऐश्वर्या जेव्हा नवव्या इयत्तेत होती तेव्हा तिला केम्लिन पेन्सिलच्या पहिल्या व्यावसायिक जाहिरातीमध्ये दिसली. नेदरलँड्सच्या केकेनहॉफ गार्डनमध्ये तिच्या नावाचे फुल आहे आणखी वाचा Subscribe to Notifications