Happy Birthday Aishwarya : पाहा, बर्थ डे गर्ल ऐश्वर्या रायचे कधीही पाहिले नसतील असे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 4:06 PM1 / 11सौंदयार्ची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले2 / 11ऐश्वयाचे अख्खे बालपण मुंबईत गेले आणि याच मुंबईत राहून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.3 / 11ऐश्वर्याने आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात तिचे शिक्षण झाले. पुढे ऐश्वर्या आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात ओढली गेली.4 / 11 या मॉडेलिंगच्या दुनियेत वावरत असताना मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण या स्पर्धेत सुश्मिता सेन अव्वल ठरली आणि ऐश्वर्याला दुसरा क्रमांक मिळाला.5 / 11अर्थात पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूट तिच्या डोक्यावर सजला. मिस इंडिया, मिस वर्ल्ड स्पर्धेनंतर बॉलिवूडमध्ये ती आली.6 / 11मणिरत्नम यांच्या 'इरूवर' चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा 'और प्यार हो गया' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. 7 / 11 दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा 'जीन्स' या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला.8 / 11 यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली. 9 / 11कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.10 / 11 ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ होते. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. 11 / 11जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications