ऐश्वर्या रायने वडिलांच्या पुण्यतिथीला शेअर केले हे फोटो, जागवल्या त्यांच्या आठवणी By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 7:27 PM1 / 8ऐश्वर्या रायने वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. 2 / 8तिने तिच्या वडिलांच्या फोटोसमोर तिची आई, भाऊ, अभिषेक आणि आराध्यासोबत फोटो काढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.3 / 8ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय यांचे दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले होते. 4 / 8कॅन्सरने त्रस्त असल्याने कृष्णराज यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण तरीही दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावतच गेली.5 / 8वडिलांच्या निधनानंतर ऐश्वर्या पूर्णपणे खचली होती. पण तिला तिचा पती अभिषेकने या दुःखातून बाहेर पडण्यास मदत केली. 6 / 8ऐश्वर्या रायच्या कुटुंबियांच्या या दुःखात संपूर्ण बच्चन कुटुंब त्यांच्या पाठिशी उभे राहिले होते. 7 / 8ऐश्वर्याच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. 8 / 8ऐश्वर्या तिच्या वडिलांची प्रचंड लाडकी होती. तिने अनेक मुलाखतींमध्ये याविषयी सांगितले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications