Join us

अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 4:10 PM

1 / 7
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात OTT प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. कोरोना काळात बहुतांश लोक घरात होते, या काळात त्यांच्या मनोरंजनासाठी OTT ने महत्वाची भूमिका बजावली. आजकाल देशातील जवळपास सर्वच मोठे स्टार्स डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांच्या 'सेक्रेड गेम्स'ने सर्वांसाठी मार्ग खुला केला.
2 / 7
आज बॉलिवूड चित्रपटात सपोर्टिंग रोल्स करणारे अभिनेते OTT गाजवत आहेत. मनोज वाजपेयीपासून पंकज त्रिपाठीपर्यंत, अनेक अभिनेत्यांना OTT ने रातोरात स्टार केलंय. या अभिनेत्यांनी OTT वर खूप काम केलंय, पण OTT चा खरा स्टार अजय देवगण ठरला आहे. आजकाल OTT वरही बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे पैसे मिळतात, यात अजय देवगण सर्वात महाग अभिनेता ठरलाय.
3 / 7
गेल्या वर्षी अजय देवगणने 'रुद्र - द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजद्वारे डिजिटल डेब्यू केला. हा शो Disney + Hotstar वर प्रदर्शित झाला आणि हिट ठरला. मीडियाच्या रिपोर्टनुसार, अजयने या सीरिजसाठी तब्बल 125 कोटी रुपये घेतले आहेत. यामुळे तो भारतातील सर्वात महागडा OTT स्टार बनला आहे.
4 / 7
या यादीत सैफ अली खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्या 'सेक्रेड गेम्स'मधून सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने OTT करिअरला सुरुवात केली. सैफ अली खानला 'सेक्रेड गेम्स'साठी 15 कोटी रुपये फी मिळाली आहे. तर, नवाजुद्दीन सिद्दीकीने 10 कोटी रुपये घेतले.
5 / 7
पंकज त्रिपाठी हा ओटीटी जगतातील दिग्गज अभिनेता मानला जातो. पंकज त्रिपाठी देशातील दोन सर्वात लोकप्रिय वेब शोचा भाग आहे. 'सेक्रेड गेम्स' (सीझन 2) आणि 'मिर्झापूर'. 'सेक्रेड गेम्स'साठी त्याला 12 कोटी रुपये देण्यात आले होते, तर 'मिर्झापूर' सीझनसाठी त्याची फी 10 कोटी रुपये होती.
6 / 7
राज आणि डीकेच्या 'द फॅमिली मॅन' या शोने मनोज वाजपेयीच्या करिअरला चांगलाच बूस्ट मिळवून दिला. या शोसाठी त्याने 10 कोटी रुपये फी घेतल्याचे सांगितले जाते.
7 / 7
अभिनेत्री राधिका आपटेदेखील OTT वरील सर्वात लोकप्रिय नाव आहे. राधिकादेखील 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये होती. तिने यासाठी 4 कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, 'द फॅमिली मॅन' सीझन 2 साठी सामंथाने 4 कोटी रुपये फी घेतली.
टॅग्स :बॉलिवूडअजय देवगणमनोज वाजपेयीपंकज त्रिपाठीराधिका आपटेसमांथा अक्कीनेनी