आयुष्यात एकदा तरी पाहाच 'हे' सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 6:35 PM1 / 10“2 अक्तूबर को क्या हुआ था?”, हा प्रश्न सिनेप्रेमींना चांगलाच माहीत असेल. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील हा डायलॉग तुफान गाजला. यावर आजही मीम्स व्हायरल होतात. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.2 / 10दृश्यम प्रमाणेच दृश्यम 2 मध्येही सस्पेन्स ठासून भरलेला आहे. त्यामुळेच सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुव्वाधार कमाई केली. या चित्रपटातील काही सीन्स आणि डायलॉगवर तुमच्याकडून आपसूकच टाळी वाजवली जाते. अजय देवगण आणि तब्बू जेव्हा स्क्रीनवर एकमेकांसमोर येतात, तेव्हा त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. दृश्यम आणि दृश्यम 2 हे दोन्ही सिनेमे तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.3 / 10 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या 'बदला' सिनेमातील 'बदला लेना सही नहीं होता, लेकिन हर बार माफ़ कर देना सही नहीं होता' हा डॉयलॉग चांगलाच गाजलेला आहे. या सिनेमात जबरदस्त सस्पेन्स पाहायला मिळतो. 4 / 10सुजॉय घोष दिग्दर्शित चित्रपटात जसजशी कथा पुढे सरकते, तस-तसे प्रेक्षकांना सस्पेन्सचे हादरवतात. IMDb ने या चित्रपटाला 7.8 रेटिंग दिले आहे. हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्ही पाहू शकता5 / 10आयुष्मान खुराना स्टारर 'अंधाधुन' हा डार्क कॉमेडी जॉनरचा चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही पाहू शकता. 6 / 10हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2018 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये आयुष्मानच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आयुष्मान आणि तब्बू यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळते. 7 / 10नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असलेला 'रात अकेली है' हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे. शिवाय सस्पेन्सचाही तडका आहे. हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 8 / 10आमिर खान, राणी मुखर्जी आणि करीना कपूर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'तलाश' हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही आता Amazon Prime Video वर पाहू शकता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.9 / 102018 साली प्रदर्शित झालेला 'यू-टर्न (U-Turn)' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटातील समंथा रुथ प्रभूच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. हा सिनेमा तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.10 / 10सस्पेन्स-थ्रिलर प्रेमींनी हा चित्रपट चुकवू नये. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. 'परी'मध्ये भयपटासह सस्पेन्सचा टचही जोडण्यात आला आहे. तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा पाहू शकता आणखी वाचा Subscribe to Notifications