Join us

...अशी होती अक्षय कुमार आणि ट्विंकल यांची लव्हस्टोरी; मॅगझिन फोटोशूट दरम्यान पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 1:10 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आज (29 डिसेंबर) रोजी ती 50 वर्षांची झाली. हा खास दिवस ट्विंकल अक्षय कुमार आणि मुलांसोबत साजरा करत आहे.
2 / 10
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची बाँडिंग जबरदस्त आहे. या दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. पण दोघांनीही एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. ट्विंकलवरचं अक्षयचं प्रेम कधीच तसुभरही कमी झालं नाही.
3 / 10
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची पहिली भेट एका मॅगझिन फोटोशूट दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. 'इंटरनॅशनल खिलाडी' चित्रपटात एकत्र काम केले. तेव्हा ते एकमेकांच्या जवळ आले. जेव्हा अक्षय कुमारने तिला लग्नासाठी प्रपोज केले.
4 / 10
तेव्हा अट ठेवण्यात आली की जर ट्विंकलचा 'मेला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तर ती त्याच्याशी लग्न करणार नाही. परंतु ट्विंकलच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी केली नाही. .
5 / 10
अक्षय आणि ट्विंकलच्या लव्हस्टोरीमध्ये मोठा अडथळा ठरला म्हणजे, डिंपल कपाडियांना अक्षय कुमार समलिंगी वाटत होता. त्यामुळे सुरुवातीला डिंपल यांनी लग्नाला साफ नकार दिला. पण काही काळानंतर हा संभ्रम दूर झाला.
6 / 10
दोघांनी 2001 मध्ये दोघांनी लग्न केले. अक्षयसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकलने तिच्या अभिनयापासून ब्रेक घेतला. या जोडप्याला आरव आणि नितारा अशी दोन मुले देखील आहेत.
7 / 10
ट्विंकलने एका मुलाखतीमध्ये डेटिंगचे दिवस आठवताना अक्षयसोबत जुन्या आठवणी शेअर केल्या. ती म्हणाली, 'आम्ही पाचव्या डेटवर होतो. तेव्हा 'तुझ्यासारख्या कोणाशीही मी लग्न करणार नाही...', असे अक्षयला म्हणाले होते. यावर तो म्हणाला, 'पण मला आठवत नाही की मी तुला कधी माझ्याशी लग्न कर असे म्हटले...?'. अक्षयच्या या उत्तराने मी प्रभावित झाले, असेही ट्विंकलने सांगितले.
8 / 10
ट्विंकल खन्ना आजच्या घडीला एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखली जाते. तिच्या लिहिण्यातला उपरोधिक विनोद ही तिची खास शैली बनली. काही काळापूर्वी ट्विंकल खन्नाने तिचे चौथे पुस्तक 'वेलकम टू पॅराडाइज' लाँच केले आहे. याआधी तिची 'मिसेस फनीबोन्स', 'द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद', 'पायजमा आर फॉरगिव्हिंग' ही तीन पुस्तकेही लॉन्च झाली आहेत.
9 / 10
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत.
10 / 10
दोघांचीही जीवनाबद्दल विचारसरणी एकमेकांपेक्षा खूप वेगळी असली तरीही अक्षय-ट्विंकल आजपर्यंत बदललेले नाही.
टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्नासेलिब्रिटीबॉलिवूड