PHOTOS : अक्षय कुमारची पहिली हिरोईन शांतीप्रियानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, तुम्ही पाहिलंत का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 4:05 PM1 / 9‘बॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमारच्या करिअरची सुरुवात झाली ती ‘सौगंध’ या चित्रपटाने. या चित्रपटातील हिरोईन शांतीप्रिया तुम्हाला आठवत असेलच? अक्षय व शांतीप्रियाने 1991 साली ‘सौगंध’ या चित्रपटातून एकत्र डेब्यू केला होता.2 / 9या चित्रपटानंतर अक्षय मोठा स्टार झाला. पण शांतीप्रिया मात्र एका हिटसाठी ताटळत राहिली. करिअरमध्ये तिने खूप चित्रपट केलेत. पण स्टारडम नावाची गोष्ट तिला कायम हुलकावणी देत राहिली. आता हीच शांतीप्रिया 30 वर्षानंतर पुन्हा डेब्यू करतेय.3 / 9अर्थात या 30 वर्षांत शांतीप्रिया पुरती बदलली आहे. इतकी की तिला ओळखणंही कठीण होईल. सध्या तिच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. होय, तिने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.4 / 9 शांतीप्रियाची आणखी दुसरी ओळख म्हणजे, साऊथ अभिनेत्री भानुप्रियाची ती बहीण. ‘सौगंध’नंतर शांतीप्रिया तीन चित्रपटात ती दिसली. पण या तीनचं चित्रपटानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. 5 / 9‘सौगंध’नंतर शांतीप्रियाने ‘वीरता’ आणि ‘इक्के पे इक्का’ हे दोन चित्रपट केलेत आणि त्यानंतर ती दिसलीच नाही. आता 28 वर्षानंतर ती सरोजिनी नायडू यांच्या बायोपिकमध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे.6 / 91999 मध्ये शांतीप्रियाने बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ रे याच्यासोबत लग्न केलं. सिद्धार्थने ‘बाजीगर’ चित्रपटात काजोलचा मित्र आणि इन्पेक्टर करण सक्सेनाची भूमिका साकारली होती.7 / 9 दुदैवाने सिद्धार्थचे ऐन चाळीशीत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं यावेळी शांतीप्रिया केवळ ३५ वर्षांची होती. दोघांनाही दोन मुले आहेत.8 / 9बॉलिवूडमधून शांतीप्रिया गायब झाली, यानंतर साऊथमध्ये मात्र तिने काम केले. याशिवाय मुकेश खन्नाच्या आर्यमान, माता की चौकी, द्वारकाधीश अशा मालिकांत ती दिसली.9 / 9‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शांतीप्रियाने धक्कादायक खुलासा केला होता. ‘सौगंध’च्या सेटवर अक्षय माझी रंगावरून खिल्ली उवायचा. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते, असं ती म्हणाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications