Join us

IN PICS : अक्षय कुमारने 2 वर्षांत दिले 7 हिट; 7 वर्षांत 17 सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 8:00 AM

1 / 9
अनेक वादानंतर अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा काल 9 नोव्हेंबरला डिज्नी हॉटस्टारवर रिलीज झाला. नेहमीप्रमाणे अक्षयचे फॅन्स या सिनेमावर तुटून पडले. आज याच सिनेमाच्या निमित्ताने अक्षयच्या फिल्मी करिअरबद्दल आम्ही सांगणार आहोत.
2 / 9
29 वर्षांपूर्वी अक्षयने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘सौगंध’ हा त्याचा पहिला सिनेमा. या सिनेमाने फार कमाल केली नाही. पण अक्षय कुमार नावाचा चेहरा प्रकाशझोतात आला. यानंतर 1992 साली आलेल्या ‘खिलाडी’ आणि 1993 साली प्रदर्शित ‘वक्त हमारा है’ या सिनेमाने अक्षयला नवी ओळख दिली. तेव्हापासून अक्षयने आत्तापर्यंत शेकडो सिनेमे केलेत. आज तर यशाची हमी म्हणूनच त्याच्याकडे बघितले जाते.
3 / 9
तिन्ही खानांवर मात - हिट देण्याच्या बाबतीत अक्षय बॉलिवूडच्या तिन्ही खानांपेक्षा कितीतरी पुढे आहे. आमिर खान, शाहरूख खान, सलमान खान यांना त्याने कधीच मागे सोडले आहे. गेल्या काही वर्षांत सलमानचे ट्युबलाईट, रेस 3, दबंग 3 , भारत हे सिनेमे फार कमाल दाखवू शकले नाहीत. याऊलट अक्षय कुमारचा प्रत्येक सिनेमा हिट ठरला.
4 / 9
एकापाठोपाठ एक हिट - गेल्या दोन वर्षांत शाहरूखचा एकही नवा सिनेमा रिलीज झालेला नाही. आमिर खान ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ दणकून आपटला. याऊलट अक्षयने गेल्या 7 वर्षांत सलग एकापाठोपाठ एक हिट सिनेमांचा धडाका लावला.
5 / 9
7 वर्षांत 17 सुपरहिट - गेल्या 7 वर्षांत अक्षयने 17 सुपरहिट सिनेमे दिले आहेत. यामुळे आज तो बॉलिवूडचा टॉप स्टार आहे.
6 / 9
तीन सिनेमांनी कमावले 200 कोटी- अक्षयच्या अलीकडच्या तीन सिनेमांनी 200 कोटींपेक्षा अधिक बिझनेस केला. यात मिशन मंगल, हाऊसफुल 4आणि गुड न्यूज या सिनेमांचा समावेश आहे. त्याआधीचे केसरी, गोल्ड, 2.0, पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा हे त्याचे सिनेमेही हिट झाले होते.
7 / 9
2013 मध्ये दिले होते फ्लॉप - गेल्या काही वर्षांत अक्षयचा फ्लॉप सिनेमा शोधूनही सापडणार नाही. 2013 मध्ये मात्र त्याचा ‘बॉस’ हा सिनेमा दणकून आपटला होता. या सिनेमाने केवळ 50 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाचे बजेट होते 70 कोटी. यानंतर मात्र अक्षयने असा एकही सिनेमा दिला नाही, ज्यात निर्मात्याला नुकसान सहन करावे लागले असेल.
8 / 9
बॉस नंतर हिटच हिट - बॉस हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अक्षयने हॉलीडे, एंटरटेनमेंट, बेबी, गब्बर इजबॅक, सिंग इज ब्लिंग, हाऊसफुल 3, रूस्तम, जॉली एलएलबी 2,केसरी, गोल्ड, 2.0, पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा, गुड न्यूज असे अनेक हिट सिनेमे दिलेत
9 / 9
अनेक प्रोजेक्ट - अक्षय कुमारकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. पृथ्वीराज, सूर्यवंशी, बच्चन पांडे, अतरंगी असे अनेक सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
टॅग्स :अक्षय कुमार