By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 11:35 IST
1 / 7अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी हे कपल नुकतंच लग्नबंधनात अडकलं. सध्या या दोघांचीच प्रचंड चर्चा आहे. 2 / 7'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणा आणि अंजली घराघरात पोहोचले होते. ही मालिका दोन वर्षांपूर्वी बंद झाली होती. मात्र आजही या मालिकेचे चाहते राणा आणि अंजलीला मिस करतात. त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची अपेक्षा व्यक्त करतात. आता मात्र चाहत्यांची हिच इच्छा पूर्ण होणार आहे. 3 / 7अक्षया-हार्दिकच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. हे कपल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. 4 / 7अक्षया आणि हार्दिक पुन्हा झी मराठीवर एकत्र दिसणार आहेत. परंतु एका एपिसोडसाठी. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. अक्षया आणि हार्दिक झी मराठीवरील लोकप्रिय 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दोघेही यामध्ये विविध मजेशीर खेळ खेळतांना दिसून येणार आहेत. 5 / 7मकरसंक्रांत विशेष भागात अक्षया-हार्दिक आपल्याला दिसून येणारेत. नुकताच याचा प्रोमो देखील समोर आला आहे. 6 / 7अक्षय आणि हार्दिकने काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली आहे. याआधी साखरपुडा करत दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. 7 / 7अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुडा आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या दोघांचे चाहते त्यांना रिअल लाईफमध्ये एकत्र पाहून फारच आनंदी होत आहेत.