Join us

‘ब्रह्मास्त्र’चं शूटींग संपताच आलिया-रणबीरनं घेतलं बाबा विश्वनाथाचं दर्शन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:01 AM

1 / 7
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची दीर्घकाळापासून चर्चा आहे. गेल्या चार वर्षांपासून या सिनेमाच्या पहिल्या भागाचं शूटींग सुरू होतं. अखेर चार वर्षानंतर शूटींग संपलं आणि आलिया व रणबीर यांनी सोबत काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं.
2 / 7
वाराणसीमधील गंगा घाटावरील सिनेमाचं चित्रीकरण संपल्यानंतर चित्रपटाची टीम देव दर्शनसाठी पोहोचली. यावेळी सिनेमाच्या टीमनं बाबा विश्वनाथकडे सिनेमाला यश मिळो अशी प्रार्थना केली.
3 / 7
आलियानं तिच्या इन्स्टाला याचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत आलिया व रणबीर दोघंही बाबा विश्वनाथ मंदिरात पूजाअर्चना करताना दिसत आहेत.
4 / 7
एका फोटो आलिया-रणबीरसोबत ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी हाही दिसतो. तिघांच्याही माथ्यावर चंदनाचा टीळा आहे. गळ्यात फुलांच्या माळा आहेत.
5 / 7
2018 मध्ये रणबीर व आलियाने ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. आता या सिनेमाच्या पहिल्या भागाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.
6 / 7
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात आलियाने ईशाची आणि रणबीरने शिवाची भूमिका साकारली आहे. सिनेमात या दोघांचा लुक कसा असणार याचा टीझर समोर आलाच आहे.
7 / 7
अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरब्रह्मास्त्रबॉलिवूड