PHOTOS : अग्गं बाई हे काय? आलियाचा बलून ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आठवली ढोबळी मिरची, अशी उडवली खिल्ली...! By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 5:01 PM1 / 9सोमवारी आलिया भट ‘डार्लिंग्स’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला पोहोचली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. विशेषत: तिच्या ड्रेसची चांगलीच चर्चा झाली.2 / 9 आलिया प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीची घोषणा केली तेव्हा आलिया लंडनमध्ये होती. त्यानंतर ती भारतात परतली पण फार कुठे दिसली नव्हती.3 / 9आज पहिल्यांदा ती पब्लिकली दिसली आणि ती सुद्धा एका वेगळ्या स्टाईलमध्ये. आलियाने पिवळ्या रंगाचा शॉर्ट बलून स्टाइल ड्रेस कॅरी केला होता.4 / 9बेबी बम्प लपवण्यासाठी आलियाने जाणीवपूर्वक या ड्रेसची निवड केली होती. या ड्रेसमध्ये तिने तिचा बेबी बम्प चतुराईने लपवला. पण तरिही लोकांनी तिची खिल्ली उडवलीच.5 / 9होय, आलियाचा शॉर्ट बलून स्टाईल ड्रेस पाहून सोशल मीडिया युजर्सनी मजेशीर कमेंट्स दिल्यात. यातल्या काही कमेंट्स चांगल्याच फनी आहेत.6 / 9आलिया, पिशवी का घातलीस? अशी कमेंट एका युजरने केली. तर पॉली बॅग इंडियात बॅन आहेत, अशी कमेंट अन्य एका युजरने केली.7 / 9काहींना तिचा हा ड्रेस पाहून लेजच्या पाकिटाची आठवण झाली. तर काहींना रेनकोट आठवला. तर काहींना चक्क पिवळी शिमला मिर्ची आठवली.8 / 9काहींनी तिला हाय हिल्स न घालण्याचा सल्ला दिला. प्रेग्नंसीमध्ये हे बरं नव्हे, असं अनेकांनी तिला आवर्जुन सांगितलं.9 / 9 ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट आलियाने को-प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात ती अभिनय करताना देखील दिसणार आहे. येत्या ५ ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications