निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos) By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 6:24 PM1 / 9Alia Bhatt Cute Look: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आज एका कार्यक्रमात दिसली. या कार्यक्रमासाठी आलियाने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घातला. त्यात ती खूपच क्यूट आणि निरागस दिसली.2 / 9आलियाच्या नव्या हेअरस्टाइलने तिच्या सौंदर्यात भर घातली. या लेटेस्ट लूकमध्ये अलिया अतिशय सालस आणि गोंडस दिसली.3 / 9आलिया ही एक उत्तम बिझनेसवूमनही आहे. तिचा क्लोदिंग ब्रँड 'एड-ए-मम्मा' खूप लोकप्रिय आहे. आलिया तिच्या कपड्यांच्या ब्रँडच्या लेटेस्ट एडिशनच्या कार्यक्रमासाठी आली.4 / 9अतिशय गोंडस आणि क्यूट लूकमध्ये ती कार्यक्रमात पोहोचली आणि तिने सर्वांची मनं जिंकली. या कार्यक्रमात तिल्या फिकट पिवळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड ड्रेसने ती सर्वांच्यात विशेष उठून दिसली.5 / 9आलियाचा हा पिवळा स्ट्रॅपी वन पीस तिच्यावर खूपच क्यूट दिसला. लहान मुलीने फ्रॉक घालून छान गोंडस दिसावं अशी आलिया या फ्रॉक स्टाईल वन पीस मध्ये दिसली.6 / 9आलियाने ड्रेससोबत फार मेकअप न करता सिंपल लूक ठेवला. अलियाच्या नव्या छोट्या केसांच्या स्टाईलमुळे ती अधिकच चर्चेत राहिली.7 / 9आलियाने या ड्रेससोबत पांढऱ्या रंगाची हील्स घातली होती. तसेच आलियाने या फ्लोरल ड्रेससोबत कोणतीही ऍक्सेसरी घातली नव्हती.8 / 9या कार्यक्रमादरम्यान आलिया भट्टने तिच्या निरागस हास्याने सर्वांची मने जिंकली. आलियाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.9 / 9आलियाच्या या नव्या कोऱ्या लूकबद्दल चाहत्यांकडून तिची वाहवा होत आहेच, पण सोशल मीडियावरही तिची चर्चा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications