Alia Bhatt : आलिया भटनं घेतला मोठा निर्णय, लवकरच बदलणार नाव, खास आहे कारण!! By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 10:42 AM1 / 10आलिया भट सध्या आपली प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. होय, लवकरच रणबीर कपूर व आलिया भट या दोघांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. साहजिकच अख्खं कपूर कुटुंब बाळाची प्रतीक्षा करत आहे.2 / 10बाळाच्या आगमनासाठी आलिया सज्ज आहे. पण त्याशिवाय आलियाने आणखी एक तयारी केली आहे. होय, आलिया लवकरच आपलं नाव बदलणार आहे आणि यामागचं कारण अगदीच खास आहे.3 / 10होय, आलियाने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अरे..अरे...घाबरू नका. आलिया तिचं संपूर्ण नाव बदलणार नसून फक्त तिच्या नावासमोर आता कपूर हे सासरचं आडनाव लागणार आहे.4 / 10होय, येणाºया काळात आलिया भट ही आलिया भट कपूर या नावानं ओळखली जाईल. खुद्द आलियाने एका मुलाखतीत हा खुलासा केला.5 / 10‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मी आता कपूर कुटुंबाची सदस्य झाले आहे. त्यामुळे मी आता माझं नाव ऑफिशिअली आलिया भट कपूर करणार आहे.6 / 10नावातील हा बदल मला आनंद देणारा असेल. आता आमचा बेबी येणार आहे. आता मला भट राहायचे नाही. कपूर आता एकत्र राहतील...माझ्या म्हणण्याचा अथ तुम्हाला कळला असेलच, असंही ती म्हणाली.7 / 10मला कपूर घराण्याचा सदस्य म्हणून वावरायचं आहे. मला त्यांच्यापासून वेगळं राहायचं नाही. मी नेहमी आलिया भट असेल. पण आता मी कपूरही आहे. मी पासपोर्टवरचं नावही बदलणार आहे, असं ती म्हणाली.8 / 10लग्नानंतर लगेच मला नाव बदलायचं होतं. पण सतत बिझी असल्यामुळे आणि सतत विदेश प्रवास सुरू असल्यामुळे हे शक्य झालं नाही, असंही ती म्हणाली.9 / 10आलिया व रणबीरने याचवर्षी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोनच महिन्यात आलियाने ती आई बनणार असल्याची गूडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.10 / 10आलिया व रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया व रणबीर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications