आलिया भट, इमरान खान ते कतरिना कैफ यांना बजावता आला नाही मतदानाचा हक्क, काय आहे कारण? By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 1:55 PM1 / 9आलिया भट : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने मतदान केले नाही. कारण ती भारतात मतदान करू शकत नाही. आलियाला ब्रिटीश नागरिकत्व मिळाले आहे आणि तिची आई सोनी राजदान यांच्याकडे देखील ब्रिटीश नागरिकत्व आहे, त्यामुळे आलिया भारतातील कोणत्याही निवडणुकीत मतदान करू शकत नाही.2 / 9कतरिना कैफ : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहते आहे. पण ती इथे हक्क मिळवू शकत नाही. कतरिना कैफला ब्रिटीश नागरिकत्व मिळाले आहे आणि त्यामुळे ती भारतात मतदान करू शकत नाही.3 / 9इमरान खान: सुपरस्टार आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान हा भारतात राहतो, पण मतदान करू शकत नाही. कारण, इम्रानचा जन्म अमेरिकेत झाला असून त्याला तिथले नागरिकत्व मिळाले आहे.4 / 9जॅकलीन फर्नांडिस : अभिनेत्री जॅकलीन ही श्रीलंकेची आहे आणि त्यामुळे ती देखील कोणत्याही निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन अनेक वर्षे भारतात राहिल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडली गेली आहे.5 / 9सनी लिओनी: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी जवळपास 17 वर्षांपासून भारतात राहते आहे. पण मतदान करू शकत नाही. सनी लिओनी ही कॅनडाची रहिवासी आहे आणि तिच्याकडे तिथले नागरिकत्व आहे.6 / 9नोरा फतेही : बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही देखील मतदान करू शकत नाही. कारण ती भारतीय नाही. नोरा ही कॅनडाची असून तिच्याकडे तिथले नागरिकत्वही आहे.7 / 9कल्की कोचलिन: अभिनेत्री कल्की कोचलिनकडे फ्रेंच नागरिकत्व आहे. ती भारतीय राज्यघटनेनुसार मतदान करू शकत नाही.8 / 9इलियाना डिक्रूझ: 'बर्फी' आणि 'फटा पोस्टर निकला हिरो' सारखे सुपरहिट चित्रपट करणारी अभिनेत्री इलियाना देखील भारतीय नागरिक नाही.9 / 9नर्गिस फाखरी : अभिनेत्री नर्गिस फाखरी अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. पण ती कोणत्याही निवडणुकीत मतदान करू शकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications