Join us

IN PICS : नव्या घरात होणार आलिया-रणबीरच्या लेकीचा गृहप्रवेश, खास आहे ऋषी कपूर यांची खोली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 5:32 PM

1 / 10
तीन दिवसांपूर्वी (6 नोव्हेंबर)आलिया भट व रणबीर कपूर आई-बाबा झालेत. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरी लक्ष्मी आल्याने कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे आणि आता कपूर कुटुंबासाठी आणखी एक गुडन्यूज आहे.
2 / 10
होय, ऋषी कपूर व नीतू सिंग यांचा कृष्णा-राज बंगला नव्याने बनून तयार आहे. पाली हिल भागात असलेल्या या बंगल्याचं गेल्या तीन वर्षांपासून रिनोव्हेशन सुरू होतं. आता हे काम पूर्ण झालं आहे.
3 / 10
चर्चा खरी मानाल तर रणबीर व आलिया ‘प्रिन्सेस कपूर’सोबत म्हणजेच आपल्या लेकीसोबत या घरात गृहप्रवेश करणार आहेत. आलिया व रणबीरची चिमुकलीचा याच नव्या घरात गृहप्रवेश होईल.
4 / 10
नीतू कपूर, रणबीर कपूर, आलिया भट आणि त्यांची चिमुकली या नव्या बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. या 8 मजली अलिशान बंगल्याचं संपूर्ण डिझाईन आलिया व रणबीरने जातीने लक्ष घालून करवून घेतलं.
5 / 10
रिपोर्टनुसार, या बंगल्याचा एक फ्लोर नीतू कपूर यांचा असेल. याठिकाणी त्या एकट्या राहतील. दुसऱ्या माळ्यावर आलिया, रणबीर व त्यांची राजकुमारी असे तिघे राहतील.
6 / 10
तिसरा माळा बेबी गर्लचा असेल. ती मोठी झाल्यानंतर याठिकाणी शिफ्ट होईल. तिला स्वत:ची स्पेस मिळावी, यासाठी रणबीर व आलियाने आधीच तजवीज करून ठेवली आहे.
7 / 10
चौथा फ्लोर रणबीर कपूरची बहिण व आलियाची नणंद रिद्धिमा कपूर आणि तिची मुलगी समारा हिच्यासाठी रिझर्व्ह असेल. ती मुंबईला आल्यावर याठिकाणी राहील.
8 / 10
उर्वरित माळ्यांवर अद्यापही काम सुरू आहे. याठिकाणी एक मोठा स्वीमिंग पुल असेल. यापैकी एका फ्लोरवर आलिया व रणबीर ऑफिस थाटणार आहेत.
9 / 10
एक माळा अख्खा ऋषी कपूर यांना समर्पित असेल. आज ऋषी कपूर आपल्यात नाहीत. पण याठिकाणी त्यांच्या सर्व आठवणी सजवल्या जातील. याठिकाणी कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्या गप्पा गोष्टी व पार्टी करतील.
10 / 10
आलियाने 6 नोव्हेंबरला मुलीला जन्म दिला. अद्याप आलिया रूग्णालयात आहे. सगळेच बेबी गर्लची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण आलिया आपल्या मुलीचा चेहरा जगाला दाखवेल की अन्य सेलिब्रिटींप्रमाणे तिला जगापासून लपवून ठेवेल, हे तर येणारा काळच ठरवेल.
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरबॉलिवूड