Alia Ranbir Wedding : आलिया व रणबीरच्या लग्नाचे आणखी काही Unseen Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 13:47 IST
1 / 9आलिया भट व रणबीर कपूरचं लग्न थाटात पार पडलं. अजूनही या लग्नाची चर्चा सुरू आहे. सध्या काय तर लग्नसोहळ्याचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संगीत, मेहंदी, लग्नसोहळा असे सगळे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.2 / 9या फोटोत रणबीर कपूर आलियाच्या मैत्रिणींनी वेढलेला दिसतोय. मेहुण्यांसोबत रणबीर धम्माल मस्ती मूडमध्ये दिसतोय.3 / 9या फोटोत रणबीर आलियाच्या मैत्रिणींसोबत सेलिब्रेट करतोय. शॅम्पेनसोबत त्याने धम्माल पोझ दिली आहे.4 / 9आलियाच्या मैत्रिणींनी मेहुणी असल्याचा हक्क पुरेपूर बजावला. या फोटोत सगळ्याजणी रणबीरला खास गिफ्ट देताना दिसत आहेत.5 / 9हा फोटेही खास आहे. या फोटोत रणबीर व आलिया ब्राइड्समेटसोबत दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.6 / 9आलियाच्या मैत्रिणींनी आपल्या लाडक्या जीजूला छळण्याची एकही संधी गमावली नाही. जीजूसोबत सगळ्यांनीच मस्ती केली.7 / 9हा फोटो सगळ्यांत खास म्हणायला हवा. यात आलियाच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि चेहऱ्यावर मिसेस कपूर झाल्याचा आनंद आहे.8 / 9 यात आलिया तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसतेय. मैत्रिणींसोबत आलिया अशी मस्त थिरकली.9 / 9हा भावुक करणारा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आलियाचे डॅड महेश भट आपल्या जावयाला भावूक होत अलिंगन देत आहेत.