Alia Bhatt Second Pregnancy: आलिया भट आहे दुसऱ्यांदा प्रेग्नेंट?, या पोस्टमुळे चर्चेला आलं उधाण By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 1:51 PM1 / 8रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले, दोन महिन्यांनंतर अभिनेत्रीने घोषणा केली की ती आई होणार आहे.2 / 8आलियाने तिच्या प्रेग्नेंसीदरम्यान काम केले आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये, अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला. ६ जानेवारी २०२३ रोजी रणबीर आणि आलियाची मुलगी राहा दोन महिन्यांची झाली आहे आणि या जोडप्याने अद्याप मुलीची झलक दाखवलेली नाही.3 / 8आता आलिया भट पुन्हा प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली आहे. आलियाच्या नवीन पोस्टवरून चाहते तर्कवितर्क लावत आहेत.4 / 8आलिया भट्ट आजकाल तिच्या कामामुळे तसेच तिच्या मुलीमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीची छोटी परी राहा कपूर कशी दिसते, ती काय करते आणि तिच्या आवडी-निवडी काय आहेत, चाहत्यांना सर्व काही जाणून घ्यायचे आहे. 5 / 8पण चाहत्यांचे लक्ष आता राहा पेक्षा दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या घोषणेकडे लागले आहे. आलिया त्याला पुन्हा गुड न्यूज देणार आहे का? आलियाच्या मुलीला लहान बहीण किंवा भाऊ मिळेल का? असे असंख्य प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत.6 / 8आलियाने नुकतीच ही नवीन पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या चेहऱ्यासमोर एक सुंदर फूल धरले आहे ज्यामध्ये दोन दांडी आहे - ते 'दोन' चे प्रतीक आहेत. यासोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्येही लिहिले आहे – २.० स्टे ट्यून . 7 / 8या पोस्टवरून चाहत्यांना वाटते की, आलिया कदाचित पुन्हा एकदा आई होणार आहे आणि ती पुन्हा गर्भवती होऊ शकते. 8 / 8आता आलिया चाहत्यांच्या तर्कवितर्कांना कधी आणि काय उत्तर देते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications