Join us

PHOTOS : लग्नानंतर पाचच दिवसांत कामावर परतली आलिया भट, पाहा ‘मिसेस कपूर’चा नवा लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 3:33 PM

1 / 8
मिसेस कपूर कामावर परतलीये. होय, आलिया भट लग्नाच्या आठवड्याभराच्या आतच कामावर परतली आहे.
2 / 8
14 एप्रिलला आलियाने रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली आणि आज लग्नाच्या पाचव्याच दिवशी कामावर परतली.
3 / 8
लग्नानंतर पहिल्यांदा आलिया एअरपोर्टवर दिसली. यावेळी पिंक सूटमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
4 / 8
बेबी पिंक कलरचा सूट, मॅचिंग ओढणी, न्यूड मेकअप आणि माथ्यावर छोटीशी टिकली असा तिचा लूक चाहत्यांना प्रचंड भावला.
5 / 8
लग्नानंतरचा हनीमूनचा प्लान रद्द करत रणबीर कपूर कामावर परतला आहे. आलिया सुद्धा कामाला लागली आहे.
6 / 8
यावेळी आलियाने मीडियाला हसत हसत पोझ दिल्यात. आपली वेडिंग रिंग फ्लॉन्ट करताना ती दिसली.
7 / 8
मनीष मल्होत्रा व करण जोहरसोबत ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’च्या शूटींगसाठी काही दिवस जेसलमेर येथे आलियाचा मुक्काम राहणार आहे.
8 / 8
या चित्रपटात रणवीर सिंग, धर्मेन्द्र, शबाना आझमी, जया बच्चन लीड रोलमध्ये आहेत. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरबॉलिवूड