Join us

रणबीर कपूरच्या चित्रपटाची आलिया भट करणारेय निर्मिती? म्हणाली - 'असं नाही झालं तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 7:40 PM

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने सोमवारी सांगितले की तिला तिचा पती रणबीर कपूरचे दिग्दर्शनात पदार्पण असलेल्या चित्रपटाची निर्मिती करायची आहे आणि जर त्याने तिला त्यात भाग घेण्यास सांगितले नाही तर तिला 'वाईट' वाटेल.
2 / 5
रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा’मध्ये आलिया भटसोबत दिसणार आहे. याआधी एका मुलाखतीत रणबीर कपूरने सांगितले होते की, 'लॉकडाउनच्या काळात मी एक कथा लिहिली होती, जी मला खूप आवडली होती. पण ती कथा लोकांसोबत शेअर करण्याचे कौशल्य माझ्याकडे नाही. पण माझी दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे. बरं, माझी पत्नी एक निर्माती आणि खूप चांगली निर्माता आहे, त्यामुळे कदाचित ती माझ्या चित्रपटाची निर्मिती करू शकेल.
3 / 5
याबाबत डार्लिंग्सच्या इव्हेंटमध्ये आलिया म्हणाली, “आम्ही अक्षरशः चर्चा केली. मी रणबीरला म्हणाले की तू मला चित्रपटाची निर्मिती करू दिली नाहीस तर मला वाईट वाटेल!” ती म्हणाली, 'मी त्याला सांगितले की, जर तुला मला अभिनेत्री म्हणून घ्यायचे नसेल तर ठीक आहे. तो म्हणाला, 'नाही, नाही
4 / 5
त्याने गमतीने मला सांगितले की तू जुलमी आहेस. त्यावर मी म्हणाले की, मी एक क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे त्यामुळे मी चित्रपटाच्या लेखन आणि निर्मितीसाठी माझ्या सर्जनशील सूचना देईन. ‘डार्लिंग्स’ लेखक जसमीत के. रीन दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.
5 / 5
डार्लिंग्स चित्रपट नेटफ्लिक्सवर ५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या सहकार्याने आलिया भटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर