कियाराच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून सर्व अवाक्; सिंपल अन् सुंदर डिझाइननं वेधलं लक्ष! By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 2:02 PM1 / 8बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या 'सूर्यगढ पॅलेस'मध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत शाही पद्धतीने विवाह केला. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या जोडप्याची प्रेमकहाणी शेरशाह चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती.2 / 8कियारा आणि सिद्धार्थच्या शाही विवाह सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर असून हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. 3 / 8या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारे भाडेही खूप आहे. जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो. 4 / 8या पॅलेसमध्ये २५० स्क्वेअर फूट रुममध्ये एक दिवस राहण्यासाठी २० ते ३० हजार रुपये भाडे आकारण्यात येते. या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडे आकारले जाते. त्यानुसार सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र आता सध्या कियाराने घातलेल्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे. 5 / 8मिळालेल्या माहितीनूसार सिद्धार्थने प्रसिद्ध डिजायनर सब्यसाची मुखर्जी यांच्याकडून कियारासाठी मंगळसूत्र बनवून घेतले आहे. कियाराचं मंगळसूत्र दिसण्यास साधं असलं तरी त्यांची किंमत मात्र २ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या मंगळसूत्राच्यामध्ये मोठं डायमंड देखील लावण्यात आलं आहे. 6 / 8दरम्यान, सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 'शेरशाह' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडली.7 / 8२०१०मध्ये करण जोहरने त्याच्या 'स्टुडंट ऑफ द' या चित्रपटातून सिद्धार्थला लाँच केलं. तर कियारा अडवाणीने २०१४मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघं त्यांच्या रिलेशनशिपविषयी कधीच माध्यमांसमोर व्यक्त झाले नाहीत. मात्र बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्ये किंवा सहलींवर जाताना दोघांना नेहमीच एकत्र पाहिलं गेलं.8 / 8कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये कियारा पहिल्यांदाच तिच्या नात्याविषयी व्यक्त झाली होती. आम्ही लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये सहज बोलू लागलो होतो. तेव्हाच आम्ही पहिली भेट झाली होती. ती भेट अगदी सहज होती. मात्र तो दिवस मी कधीच विसरणार नाही, असं ती म्हणाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications