Join us

PHOTOS: चित्रपटात फ्लॉप ठरली असली तरी अमिषा पटेल आहे प्रचंड श्रीमंत, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 3:56 PM

1 / 10
२००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा देणारी अभिनेत्री अमिषा पटेलने पहिल्याच चित्रपटाने तरुणांना अक्षरश: वेड लावले होते.या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेललासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली. आज आमिषा आपला ४६ वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)
2 / 10
‘गदर एक प्रेमकथा’ हा तिचा दुसरा सिनेमा रिलीज झाला.हा सिनेमाही सुपरडूपर हिट ठरला. या सिनेमातील चुलबुली शकीनाच्या भूमिकेमुळे अमिषाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती.(Photo Instagram)
3 / 10
अमीषा पटेलने तिच्या कारकिर्दीत 'ये है जलवा', 'परवाना, एलन, जमीर, वाद यासारख्या अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. 2005 मध्ये अमीषाला आमिर खानसोबत मंगल पांडेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. (Photo Instagram)
4 / 10
हा चित्रपट देखील फार काही कमाल दाखवू शकला नाही. हिंदी व्यतिरिक्त, अमीषाने तिच्या कारकिर्दीत तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे.(Photo Instagram)
5 / 10
अमिषाच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तिने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. (Photo Instagram)
6 / 10
त्यानंतर ती 1992 मध्ये टफट्स युनिव्हर्सिटीमधून एकोनॉमिक्समध्ये पदवी मिळवली आहे. उच्चशिणासाठी ती अमेरिकेला गेली होती.(Photo Instagram)
7 / 10
अमिषा चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस आणि हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.(Photo Instagram)
8 / 10
गेल्या काही वर्षांपासून अमीषा कोणत्याही सिनेमात झळकलेली नाही. कामच मिळत नसल्याने ती सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. तरीदेखील ती नेहमी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.(Photo Instagram)
9 / 10
चर्चेत राहण्यासाठी ती वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट करत सा-यांचे लक्ष वेधून घेण्याचाही प्रयत्न करते.(Photo Instagram)
10 / 10
अमिषाकडे जवळपास 272,03,94,495 अधिक संपत्ती आहे. बिग बॉस आणि ‘तौबा तेरा जलवा’ हे चित्रपट सोडले तर अमिषा कोणत्या जाहिरातीमध्ये देखील झळकलेली नाहीये. पण असे असले तरी तिच्याकडे चांगलाच पैसा आहे.(Photo Instagram)
टॅग्स :अमिषा पटेल