Join us

Amitabh Bachchan Birthday : पाच आलिशान बंगल्यांचे मालक आहेत 'बिग बी'; रेंटवर घरं देऊन कमवतात मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 1:24 PM

1 / 9
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती' हा टीव्ही शो देखील होस्ट करत आहेत. तसंच सध्या ते अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकले आहेत.
2 / 9
अमिताभ यांना त्यांच्या कारकिर्दीत दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये 'मेगा स्टार' आणि 'बिग बी' म्हणूनही ओळखलं जातं.
3 / 9
जवळपास दोन दशकं त्यांनी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ते मूळचे मुंबईचे रहिवासी नाहीत. परंतु चित्रपटसृष्टीत आल्यानंतर ते मुंबईतच स्थायिक झाले.
4 / 9
उल्लेखनीय म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' होता, जो १९६९ मध्ये प्रदर्शित झाला. १९७३ मध्ये प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला होता. या चित्रपटानंतर त्यांना भरघोस यश मिळालं. परंतु त्यानंतर त्यांनी कधी मागे पाहिलं नाही.
5 / 9
जलसा - अमिताभ बच्चन यांच्याकडे पाच बंगले आहेत. अमिताभ आपल्या कुटुंबीयांसह जलसा याच बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांचा हा बंगला जवळपास १० हजार स्वेअर फुट परिसरात पसरलेला आहे. त्यांचा हा बंगला मुंबईतील जुहू या परिसरात आहे.
6 / 9
प्रतीक्षा - जलसा या बंगल्यात वास्तव्यास जाण्यापूर्वी ते प्रतीक्षा या बंगल्यात वास्तव्यास आहेत. ७० च्या दशकाच्या अखेरिस ते प्रतीक्षा या बंगल्यात राहण्यास गेले होते. अनेक वर्षे ते आपल्या आई-वडिलांसह याच ठिकाणी राहिले होते. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांचं बालपणही याच ठिकाणी गेलं.
7 / 9
जनक - अमिताभ बच्चन यांच्या तिसऱ्या बंगल्याचं नाव जनक असं आहे. या ठिकाणी त्यांचं आणि त्यांची चित्रपट कंपनी सरस्वतीचं कार्यालयही आहे. २००४ मध्ये त्यांनी हा बंगला खरेदी केला होता.
8 / 9
वत्स - हा अमिताभ बच्चन यांचा चौथा बंगला आहे. हा बंगलाही जलसाच्या नजीकच आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत या ठिकाणी सिटी बँकेचं एक कार्यालय होतं. याचाही मालही हक्क अमिताभ बच्चन यांच्याकडेच असल्याचं म्हटलं जातं. आता तिच जागा स्टेट बँक ऑफ इंडिया भाड्यानं घेणार असल्याची चर्चा आहे. यासाठी बँकेनं १५ वर्षांसाठी करार केल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी त्यांना १८.९० लाख रूपये महिन्याला मिळतील.
9 / 9
२०१३ मध्ये जलसाच्या मागील बाजूचा बंगलाही बिग बी यांनी ६० कोटी रूपयांना खरेदी केला होता. तोदेखील त्यांनी सध्या भाड्यानं दिला आहे. त्यांचा बंगला अन्य स्टार्सच्या तुलनेत अतिशय महाग आहे. या ठिकाणीही त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी असते.
टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडमुंबई