३ हजाराची साडी अन् फक्त दीड लाखांचा खर्च; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने पुण्यात केलं होतं साधेपणाने लग्न
By देवेंद्र जाधव | Updated: March 26, 2025 15:11 IST
1 / 7फोटोमधील या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलं का. पुण्यात कमीत कमी खर्चात लग्न करुन या अभिनेत्रीने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला.2 / 7ही अभिनेत्री आहे अमृता राव. 'मै हू ना', 'विवाह', 'जॉली एल एल बी' अशा सिनेमांमधून अमृता राव झळकली. 3 / 7अमृता रावने २०१४ ला पुण्यात तिचा बॉयफ्रेंड अनमोलसोबत लग्नगाठ बांधली. अनमोल हा एक सुप्रसिद्ध RJ आहे.4 / 7पुण्यातील एका इस्कॉन मंदिरात अमृताने लग्न केलं. अमृताने लग्नात फक्त ३ हजारांची साडी नेसली होती. याशिवाय अमृता-अनमोलने कमीत कमी खर्च करुन अवघ्या दीड लाखांमध्ये लग्न केलं.5 / 7अमृता सध्या कोणत्याही सिनेमात दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर सक्रीय असते. अमृता सोशल मीडियावर विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत असते.6 / 7अमृता-अनमोलने इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे अजिबात दिखावा किंवा वाढीव खर्च न करता साध्यासुध्या पद्धतीने लग्न केले होते.7 / 7अमृता रावने 'विवाह', 'जॉली एल एल बी', 'मै हू ना' सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका आजही चाहत्यांच्या फेव्हरेट आहेत.