तिच्या गाण्यांवर थिरकता थिरकता तीच तिची प्रेरणा बनली आणि अमृता खानविलकरने ‘तो’ निर्णय घेतला! By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 8:00 AM1 / 10‘वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आज तिचा वाढदिवस.2 / 10 23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यात जन्मलेल्या अमृताने 2004 साली ‘इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज ’या कार्यक्रमात भाग घेतला, तिसरा क्रमांक पटकवला आणि सिनेसृष्टीतील तिचा प्रवास सुर झाला. 3 / 10माधुरी दीक्षित ही अमृताची रोल मॉडेल. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिच्याकडूनच अमृताला प्रेरणा मिळाली होती. खुद्द अमृताने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. 4 / 10लहानपणी अमृताच्या कॉलनीत गणेशोत्सवात किंवा इतर कार्यक्रमांना मला माधुरी दीक्षितच्या गाण्यांवर डान्स करायला तिला अतिशय आवडत असे. हीच माधुरी पुढे अमृताची रोल मॉडेल बनली.5 / 10अमृता खानविलकर जशी उत्तम अभिनेत्री आहे तसाच ती सुंदर डान्सही करते. तिने अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं आहे. 6 / 10नच बलिये, एकापेक्षा एक अशा शोमधून तिने आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. तर कॉमेडी एक्स्प्रेस, बॉलिवूड टूनाईट या कार्यक्रमांचं तिने सूत्रसंचालन केलं. 7 / 10गोलमाल, साडे माडे तीन, दोघात तिसरा आता सगळं विसरा, अर्जून, झकास, धूसर, सतरंगी रे, शाळा, आयना का बायना, बाजी, कट्यार काळजात घुसली यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने उत्तम अभिनय केला आहे. 8 / 10राझी, फूंक, या हिंदी चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. खतरो कें खिलाडी या शोमध्येही ती सहभागी झाली होती. 9 / 10अमृता खानविलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. 10 / 10फिटनेसच्या बाबतीत अमृता अतिशय जागृक आहे. योग्य डाएट आणि व्यायामावर ती भर देते. आणखी वाचा Subscribe to Notifications