Photos: गुलाबी हाय स्लिट ड्रेस, सिल्व्हर ज्वेलरी; अंबानींच्या रिसेप्शनसाठी अमृताचा खास लूक By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 4:06 PM1 / 7अंबानी वेडिंग यावर्षीचा सर्वात चर्चेतला मुद्दा आहे. आधी प्री वेडिंग आणि आता ग्रँड वेडिंगमुळे ते चर्चेत राहिले. या लग्नाला कोण कोण आलं आणि कोण नाही याचीही तेवढीच चर्चा झाली.2 / 7सर्व बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांच्या मांदियाळीत काही मराठी सेलिब्रिटींनाही अनंत अंबानी आणि राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनचं आमंत्रण मिळालं. त्यातच होती सर्वांची लाडकी अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar).3 / 7अमृताने अंबानींच्या रिसेप्शनला हजेरी लावली. तिच्या खास लूक्सचे फोटो तिने शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये अमृता अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही.4 / 7अमृताने गुलाबी रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. डीपनेक ब्लाऊज आणि हाय स्लिट ड्रेसने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 5 / 7यासोबतच तिने सुंदर डायमंड-सिल्व्हरने चमचमता असा सुंदर नेकलेस परिधान केला आहे. तसंच हातात नाजूक सिल्व्हर ब्रेसलेट आणि कपाळावर बिंदीही आहे. तिच्या बोटातील शायनिंग अंगठीनेही लक्ष वेधून घेतलंय.6 / 7केसांचा बन बांधून तिने लूक पूर्ण केला आहे. तसंच तिचा मेकअपही ऑन पॉइंट आहे. तिच्या डोळ्यांचा रंगही अगदी उठून दिसत आहे. 7 / 7'For the अr wedding' असं कॅप्शन तिने दिलं आहे. अमृताने इन्स्टाग्रामवर फोटोशूट शेअर केलं आहे. यावर चाहत्यांनी कमेंट करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय. आणखी वाचा Subscribe to Notifications