मोगऱ्याच्या गजऱ्याचा ब्लाऊज! अनन्या पांडेची अजबच फॅशन; शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:21 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सुरुवातीला ट्रोल होणाऱ्या अनन्याने आता मात्र इंडस्ट्रीत वेगळी ओळख मिळवली आहे.2 / 7'कॉल मी बे' या वेब सीरिजमधून तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यात तिला यश आलं आहे. तिच्या सीरिजमधील कामाचं खूप कौतुक झालं आहे. शिवाय त्याचदरम्यान तिचा CTRL हा सिनेमाही ओटीटीवर आला. याचंही खूप कौतुक झालं.3 / 7करिअरमध्ये चांगला कंटेंट देणारी अनन्या आता मात्र पुन्हा ट्रोल होत आहे. त्याचं कारण म्हणजे तिची अजब फॅशन. उर्फी जावेदच्या पावलावर पाऊल ठेवून तिनेही विचित्र फॅशन केली आहे.4 / 7अनन्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यात तिने चक्क मोगऱ्याच्या फुलांचा ब्लाऊज घातला आहे. ऑफ शोल्डर आणि मध्ये संपूर्ण मोगऱ्याचा गजरा गुंडाळला आहे.5 / 7यासोबत अनन्याने फिकट पिवळ्या पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. साडीचा पदरही तिने खांद्यावर घेतलेला नसून तसाच खाली सोडला आहे. अशा लूकमध्ये तिने हॉट पोज दिल्या आहेत.6 / 7मोकळे केस, नोज पिन, ग्लॉसी मेकअपमध्ये ती सुंदरही दिसत आहे. मात्र तिची साडी नेसायची स्टाईल आणि एकूणच फॅशन कोणालाही रुचलेलं नाही. यावरुनच ती ट्रोल होत आहे. 7 / 7अनन्याच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेकांना तिचा हा लूक आवडला देखील आहे. दिवसेंदिवस अनन्या आणखी सुंदर दिसत असल्याच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.