Ananya Panday : "मी लग्न करेन", अनन्या पांडेला व्हायचंय सेटल; नवरा आणि मुलांबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:07 IST
1 / 9अनन्या पांडेने तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, तिला येत्या ५ वर्षांत स्वतःला लग्न झालेलं पाहायचं आहे.2 / 9अभिनेत्री म्हणाली की, तिला मुलं खूप आवडतात. तिला सेटल व्हायचं आहे. लहान मुलांव्यतिरिक्त तिला श्वान देखील खूप आवडतात.3 / 9एका मुलाखतीत अनन्या म्हणाली - येत्या ५ वर्षात मला आशा आहे की, मी लग्न करेन, एक आनंदी घर असेल, जिथे मी, मुलं आणि इतर गोष्टींसाठी प्लॅनिंग करेन.4 / 9सध्या तिचं लक्ष कामावर आहे. अभिनयात स्वत:ला आणखी सुधारण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. तिला स्वतःला टॉपवर पाहायचं आहे.5 / 9सध्या अनन्याचं नाव वॉकर ब्लँकोसोबत जोडलं जात आहे. दोघेही गुपचूप डेट करत असल्याची चर्चा आहे.6 / 9गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दोघे एकत्र दिसले होते. अभिनेत्रीने वॉकरची तिचा पार्टनर म्हणून ओळख करून दिली होती.7 / 9रिपोर्टनुसार, वॉकर हा जामनगरमधील वंतारा येथे काम करतो. तो प्राणीप्रेमी आहे. अनन्यासोबतच्या नात्याबाबत त्याने मौन पाळलं आहे.8 / 9चांद मेरा दिल है हा अनन्याचा आगामी चित्रपट यामध्ये ती लक्ष्यसोबत दिसणार आहे. कॉल मी बे आणि कंट्रोल या सीरिजच्या यशामुळे ती खूश आहे.9 / 9