अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 3:06 PM1 / 9मराठमोळी अभिनेत्री पल्लवी सुभाषचा आज म्हणजेच ९ जूनला वाढदिवस साजरा करते आहे. पल्लवी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत आली होती. 2 / 9एकेकाळी पल्लवी आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते क्षणार्धात संपुष्ठात आले. 3 / 9८ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ते विभक्त झाले. या ब्रेकअप करण्यामागचे कारण पल्लवी सुभाषने सांगितले.4 / 9ब्रेकअपबद्दल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पल्लवी सुभाष म्हणाली की, आम्ही दोघे वेगळे झालो आहोत हे खरे आहे. हा निर्णय आम्ही दोघांनि मिळून घेतला.5 / 9ती पुढे म्हणाली की, ही आमची खाजगी बाब असल्यामुळे आमच्या ब्रेकअपचे कारण काय आहे हे मी सांगू इच्छित नाही. 6 / 9एखादी गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे असे तुम्हाला वाटत असते. मात्र काही वर्षांनंतर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही याची तुम्हाला जाणीव होते. ब्रेकअप ही फार वाईट गोष्ट आहे, असेही ती म्हणाली. 7 / 9मी माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळातून जात आहे. दोघांचे चांगले व्हावे असाच नेहमी विचार करतो. त्यामुळे एकमेकांशी न बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही कायम मित्र राहणार असे तिने यावेळी म्हटले.8 / 9त्यानंतर अनिकेत विश्वासरावने अभिनेत्री स्नेहा चव्हाण सोबत लग्न केले. 9 / 9मात्र त्या लग्नातही अनेक समस्या आल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications