लाइमलाइटपासून दूर राहते अनिल कपूरची छोटी मुलगी, मोठ्या बहिणीच्या आधीच करणार होती लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 11:39 AM1 / 12बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची छोटी मुलगी आणि सोनम कपूरची बहिण रिया कपूर ३३ वर्षांची झाली आहे. रियाचा जन्म ५ मार्च, १९८७ साली मुंबईत झाला होता. 2 / 12रिया बॉलिवूड इंडस्ट्रीत निर्माती म्हणून सक्रीय आहे. 3 / 12रियाने २०१० साली मोठी बहिण सोनम कपूर व अभय देओलचा चित्रपट आयशाची निर्मिती केली होती. 4 / 12याशिवाय तिने सोनम अभिनीत खुबसूरत आणि वीरे दी वेडिंगचीही निर्मिती केली आहे. रिया सोनमसारखी अभिनय क्षेत्रात नसल्यामुळे ती लाइमलाइटपासून दूर असते.5 / 12रिया निर्मातीसोबत एक फॅशन डिझायनरदेखील आहे. सोनम कपूरचे ड्रेस ती स्वतःच डिझाईन करते. तिचा फॅशन ब्रॅण्ड आहे रेहसन (Rheson). 6 / 12रियाचा बॉयफ्रेंड करण चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने आयशा व वेकअप सिड यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.7 / 12 करणने कित्येक चित्रपट व शोजचे दिग्दर्शन, प्रोडक्शन व डबिंगचे काम केले आहे.8 / 12२०१३ साली वृत्त आले होते की रिया आणि करणचे लग्न सोनम कपूरच्या आधी होणार आहे. 9 / 12करणची फॅमिली यानिमित्ताने कपूर फॅमिलीला भेटण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आले होते10 / 12याशिवाय असेही वृत्त आले होते की डिसेंबर २०१३ साली त्यांचे लग्न फिक्स झाले आहे. मात्र काही कारणांमुळे ते झालं नाही.11 / 12रियापेक्षा आणखीन एक लहान भाऊ आहे. त्याचे नाव आहे हर्षवर्धन कपूर. 12 / 12ज्याने मिर्झिया सिनेमातून करियरला सुरूवात केली. आणखी वाचा Subscribe to Notifications