Join us

Who is Anubhav Singh Bassi: रणबीर नव्हे ‘बस्सी’ची हवा..., ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर रिलीज चर्चेत आला हा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 3:48 PM

1 / 10
‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला अन् स्टॅंडअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचं नाव ट्रेंड होऊ लागलं. तू झूठी मैं मक्कार ट्रेलरमध्ये २-३ सीनमध्ये दिसलेला अनुभव कोण, कुठला हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
2 / 10
तू झूठी मै मक्कार सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. अनुभव सिंग बस्सीनं रणबीरच्या खास मित्राची भूमिका केली आहे. या सिनेमातून अनुभव बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.
3 / 10
हा अनुभव सिंह बस्सी कोण आहे, हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल. तर तो स्टँड अप कॉमेडीचा बादशाह आहे.
4 / 10
बस्सीचा शो म्हटल्यावर तो हाऊसफुल असणार, हे ठरलेलं समीकरण आहे. भारतातील तब्बल ३५ शहरांमध्ये त्याचे कॉमेडी शो झाले आहेत. विदेशातही त्याचे शो झाले आहेत.
5 / 10
बस्सीची स्टँड अप कॉमेडी ऐकण्यासाठी दूरून दूरून लोक येतात. त्याचे जगभर चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखोंची फॅन फॉलोइंग आहे.
6 / 10
अनुभव सिंह बस्सी हा मूळचा उत्तर प्रदेशातला. अनुभवनं २०१५ मध्ये डॉ.राम मनोहर लोहिया या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून वकीलीचं शिक्षण घेतलं आहे.
7 / 10
त्याने अनेक वर्ष युपीएससीचा अभ्यास केला. बिझनेसमध्ये देखील नशीब आजमावलं. पण कॉमेडीतील त्याच्या आवडीनं त्याला त्याचं करिअर बदलायला लावलं.
8 / 10
२०१७ मध्ये अनुभवनं स्टॅंड-अप कॉमेडीच्या आपल्या कार्यक्रमांना सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा ओपन माइक परफॉर्मन्स दिला. लाखो लोकांनी त्याचा हा परफॉर्मन्स पाहिला.
9 / 10
अनुभवचं स्वतःचं युट्युब चॅनेल देखील आहे. ज्याला तीन मिलियनहून अधिक लोकांनी सबस्क्राइब केलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
10 / 10
नेटफ्लिक्सचा एक शो अनुभवनं होस्ट केला होता. या शोमध्ये त्याने कपिल शर्माची मुलाखत घेतली होती. त्याला टेड टॉकसाठी देखील बोलावलं गेलं होतं.
टॅग्स :रणबीर कपूरश्रद्धा कपूरसिनेमा