Join us

किरण खेर यांचा कॅन्सरशी लढा सुरुच, कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतला,पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 1:01 PM

1 / 10
सोशल मीडियावर काही लोक किरण खेर यांच्या निधनाची खोटी बातमी देऊन त्यांना श्रद्धांजली वाहत होते. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, मी लोकांना विनंती करतो की अशा निगेटिव्ह बातम्या पसरवू नका. आभारी. सुरक्षित रहा.
2 / 10
अनुपम खेर यांनी लसीकरण केंद्रावरील फोटोदेखील शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत कुंटुबासोबत ते दिसत आहेत.नुकतेच अनुपम खेर यांनी लस घेतल्याचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 10
किरण खेर यांनी पहिला डोस घेतला तेव्हाही लस घेतल्याची माहिती दिली होती.कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये पहिला डोस किरण खेर यांनी घेतला होता.
4 / 10
यात किरण खेर यांचाही फोटो शेअर केला आहे. उपचारानंतर पहिल्यांदाचा किरण खेर यांचा फोटो समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते.
5 / 10
समोर आलेल्या फोटोत पांढ-या रंगाचा ड्रेस, चेह-यावर मास्क, हाताला प्लास्टर लावला आहे. कधीकाळी चेह-यावर हास्य, बोलके डोळे आणि निखळ सौंदर्यावर सारेच फिदा व्हायचे.आजारणामुळे त्यांच्यात खूप बदल झाले आहेत.
6 / 10
सध्या सोशल मीडियावर किरण खेर यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून किरण खेरच आहेत ना, असा प्रश्न पडतो. कारण, या फोटोंमध्ये त्यांच्यात फारच बदल झाल्याचं लक्षात येतं. आजारपणामुळे किरण खेर बऱ्याच अशक्तही झाल्याचे लक्षात येतंय.
7 / 10
अनुपम खेर स्वतः किरण खेर यांच्या तब्येतेची माहिती चाहत्यांसह शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी ध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती एक फायटर आहे आणि ती या आजारावर लवकर मात करेन. तिची प्रकृती स्थिर आहे. किरण लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करा’ असे अनुपम यांनी म्हटले होते.
8 / 10
लस घेतानाचा फोटो पाहून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट होते. लवकरात लवकर किरण खेर यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी. चाहतेही रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसतात.
9 / 10
मागील वर्षी ११ नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले होते.
10 / 10
गेल्या ४ महिन्यांत त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. आता त्यांना रूग्णालयात भरती होण्याची गरज नाहीये. फक्त चाचण्या व उपचारासाठी नियमितपणे रूग्णालयात जावे लागणार आहे.
टॅग्स :किरण खेरअनुपम खेर