टीम इंडियाच्या पराभवानंतर मुलीवर बलात्काराची धमकी दिल्याने अनुष्का शर्मा संतप्त, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 4:31 PM1 / 6संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे. संघाच्या खराब कामगिरीचा राग फॅन्सकडून सोशल मीडियावर काढला जात आहे. आधी मोहम्मद शमीला धर्मावरून ट्रोल केल्यानंतर आता विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची कन्या वामिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. ट्रोलर्सकडून मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आल्याने अनुष्का शर्मा प्रचंड संतप्त झाली असून, तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. 2 / 6ट्रोलर्सनी विराट आणि अनुष्का शर्माची ९ महिन्यांची मुलगी वामिका हिच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. तसेच तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. ट्रोल्सकडून व्यक्त होत असलेल्या या तीव्र प्रतिक्रियांमुळे अनुष्का शर्मा दु:खी आहे.3 / 6अनुष्का शर्माच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की, एक सेलेब्रिटी असल्याने अनुष्कामध्ये ट्रोलिंग आणि निगेटिव्ह गोष्टींचा सामना करण्याची क्षमता आहे. ती एक कणखर स्त्री आहे. त्यामुळे अशा फॅन्सच्या बोलण्याचा तिच्यावर परिणाम होत नाही. मात्र यावेळी थेट मुलीवरच अक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याने अनुष्का दुखावली गेली आहे. तसेच कुठल्याही आई प्रमाणे तिला राग अनावर झाला आहे. 4 / 6दरम्यान, सोशल मीडियावर सुरू असलेल्या या नकारात्मक वातावरणामुळे अनुष्का शर्मा सोशल मीडियाला रामराम ठोकणार का? अशी विचारणा होत आहे. मात्र अनुष्का शर्मा सोशल मीडिया सोडणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 5 / 6 टी-२० विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत झाल्याने भारतीय संघाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. सुरुवातीला पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात आले. नंतर आता विराट ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 6 / 6अनुष्का शर्माच्या मुलीवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा विरोधही केला जात आहे. दिल्ली महिला आयोगानेही याची दखल घेत दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला याबाबत पत्र लिहिले आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications