अपूर्वा नेमळेकर सांगतेय, या व्यक्तीवर करते मी जीवापाड प्रेम By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 7:45 PM1 / 10अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडद्यावरील अपूर्वाच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.2 / 10तिच्या प्रत्येक भूमिकेचे सर्वत्र कौतुक झालं. अभिनयाप्रमाणेच सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अपूर्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.3 / 10अपूर्वा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि मालिकांविषयी तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.4 / 10नुकताच अपूर्वाने एक फोटो शेअर केला असून ती या फोटोतील व्यक्तीवर जीवापाड प्रेम करते असे तिने सांगितले आहे. 5 / 10ही व्यक्ती दुसरी कोणी नाही तर तिची आई आहे. तिने आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 6 / 10अपूर्वाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. 7 / 10मरणयातना सहन करून जी आपली जीवनयात्रा सुरू करुन देते ती.... 'आई', असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे. 8 / 10रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता या भूमिकेमुळे अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 9 / 10शेवंता या भूमिकेनंतर 'तुझ माझं जमतंय' या सिरीअलमधून पम्मीच्या रुपात आपल्याला दिसली होती. 10 / 10अपूर्वाच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications