ही कोण ओळखलंत? तर प्रेक्षकांची लाडकी ‘शेवंता’, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 4:25 PM1 / 10‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय. शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची व्यक्तिरेखा साकारली होती. आज याच शेवंताचा अर्थात अपूर्वाचा वाढदिवस. ..2 / 10 27 डिसेंबर 1988 रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.3 / 10कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अॅक्टिंगच्या आॅफर येणे सुरु झाले होते. पण अपूर्वाने या सगळ्या आॅफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरे तर तिला एमबीए करायचे होते. 4 / 10अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी म्हणते.5 / 10अपूर्वाने इव्हेंट मॅनेजरमेंट कंपनीद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यापूर्वीच अभिनयातही एन्ट्री केली होती. आभास हा या मालिकेची आॅफर स्वीकारल्यानंतर एकीकडे स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि दुसरीकडे अभिनय अशी तिची कसरत सुरु होती.6 / 10अपूर्वा उत्तम अभिनी आहेच पण ती स्वत: एक उद्योजिकादेखील आहे. 2015 साली अपूर्वाले तिच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड बाजारात उतरवला होता. ‘अपूर्वा कलेक्शन’ असे तिच्या ज्वेलरी ब्रँडचे नाव आहे.7 / 10अपूर्वाला कार चालवायला प्रचंड आवडते. एकटीला भटकायलाही खूप आवडते. अपूर्वा आपली कार घेऊन देशभरात अनेक ठिकाणी एकटी फिरली आहे. 8 / 10‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने 7 ते 8 किलो वजन वाढवले होते.9 / 10झी मराठीवरील आभास हा या मालिकेतून तिने तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. तू माझा सांगाती, आराधना, तू जीवाला गुंतवावे, प्रेम या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. 10 / 10सध्या अपूर्वा झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे. यात तिच्या भूमिकेचं नाव पम्मी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications