सिनेमात अपयशी पण नशिबाने लागली लॉटरी, १० वर्षात कोट्याधीश बनला हा अभिनेता By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 9:57 AM1 / 10सध्या साऊथ स्टार्सची क्रेझ आहे. अल्लू अर्जुन, यश, राम चरण, विजय देवरकोंडा असे साऊथ स्टार्स चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. पण साऊथ स्टार्सबद्दलचं हे क्रेझ आजचं नाही तर 30 वर्ष जुनं आहे. 2 / 1030 वर्षांआधी एका गोड चेहऱ्याच्या साऊथ स्टारनं सगळ्यांना वेड लावलं होतं. होय, आम्ही बोलतोय ते तामिळ सिनेमाचा स्टार अरविंद स्वामी याच्याबद्दल. 1992 साली ‘रोजा’ आणि 1995 साली ‘बॉम्बे’ या अरविंद स्वामीच्या चित्रपटांनी बॉलिवूडप्रेमींना वेड लावलं होतं. आता हा अरविंद स्वामी बराच बदलला आहे.3 / 10एकदिवस मणिरत्नम यांची नजर त्याच्यावर पडली आणि मणिरत्नम यांनी त्याला ‘थलपती’ या सिनेमासाठी त्याला साईन केला. हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला आणि अरविंद मणिरत्नम यांचा आवडता स्टार झाला. ‘थलपती’नंतर मणिरत्नम यांनी अरविंदला धडाधड आपल्या चित्रपटांसाठी साईन केलं. 4 / 10अरविंद ‘रोजा’मध्ये दिसला. या चित्रपटाने अरविंदला एका रात्रीत स्टार केलं. पुढे मणिरत्नम यांच्याच ‘बॉम्बे’ चित्रपटातही तो झळकला. हा सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरला. Minsara Kanavu या चित्रपटात तो काजोलसोबत झळकला.5 / 10 सात रंग के सपने या सिनेमात जुही चावलासोबत त्याची जोडी जमली. 2000 साली राजा को रानी से प्यार हो गया या चित्रपटात मनीषा कोईरालासोबत तो दिसला. मात्र, त्याचे स्टारडम फार काळ टिकले नाही.6 / 101990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, अरविंद स्वामीच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. काही चित्रपट ज्यात तो मुख्य भूमिकेत होता त्यातून त्याला काढून टाकण्यात आले होते. 7 / 10निराश झालेल्या अरविंद स्वामीने 2000 नंतर चित्रपटांमध्ये अभिनय करणे थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याने वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.8 / 102005 मध्ये अरविंद स्वामीला एक भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. पायाला सौम्य लकवा मारला. यातून बरं होण्यासाठी अरविंदला 4-5 वर्षांचा कालावधी लागला.9 / 10 2005 मध्ये अपघात होण्यापूर्वी त्याने टॅलेंट मॅक्सिमस ही कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे हा व्यवसाय त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी प्रयोग ठरला. Rocketreach सारख्या विविध मार्केट ट्रॅकिंग पोर्टलनुसार, कंपनीने 2022 मध्ये 418 मिलियन (रु. 3,300 कोटी) कमाई केली होती. 10 / 10कंगना राणौतच्या थलायवी या सिनेमात अरविंदने एम जी रामचंद्रन यांची भूमिका साकारली. सुमारे 25 वर्षानंतर त्याने मल्याळम सिनेमा ओट्टू मधून वापसी केली. आणखी वाचा Subscribe to Notifications